Bhosari news|भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना मातृशोक

Bhosari news| भोसरीतील तळ्याकाठच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
Bhosari news|
Bhosari news|

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे ( वय ६५ वर्षे,रा.भोसरी) यांचे काल (ता.२४) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले.

हिराबाई यांच्या मागे पती पैलवान आणि निवृत्त एच. ए. कर्मचारी किसनराव लांडगे,तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.आमदार महेशदादा,टाटा मोटर्स युनियनचे लीडर सचिन उर्फ भैय्या लांडगे आणि उद्योजक कार्तिक लांडगे हे त्यांचे पूत्र होत. भोसरीतील तळ्याकाठच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Bhosari news|
Ajit Pawar : एकमेकाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन हिणवण्याचं काम करू नका रे बाबा !

आ.लांडगेंच्या मातोश्रींच्या निधनाचे वत्त समजताच शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आ. लांडगे व परिवाराचे सांत्वन सुरू झाले आहे. भाजपच्या विधानपरिषद सदस्या उमा खापरे,पक्षाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी नगरसेवक शंकर जगताप,प्रदेश सचिव अमित गोरखे,'भाजयुमो'चे प्रदेश प्रदेश सचिव अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर समन्वयक आणि माजी महापौर योगेश बहल,राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे आदींनी आ‌.लांडगे व परिवाराचे सांत्वन केले आहे.दरम्यान हिराबाई लांडगे यांच्या निधनामुळे भोसरीतील बैलपोळ्याची आजची मिरवणूक रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवकचे अमित लांडगे यांनी जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com