गोव्याच्या टीम फडणवीसमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे; म्हापसाची जबाबदारी

आप AAP आणि तृणमूल काँग्रेस Trunmul Congress यांनी यावेळी प्रथमच गोव्यात Goa भाजपसमोर BJP मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे टीम फडणवीसला Team Devendra भाजपने मैदानात उतरवले आहे.
गोव्याच्या टीम फडणवीसमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे; म्हापसाची जबाबदारी
Bala Bhegade, Mahesh Landge, Chitra waghpimpari reporter

पिंपरी : गोवा, उत्तरप्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. ती जाहीर होण्याअगोदरपासून गोव्यात पुन्हा सत्ता स्थापनेसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाने गोवा प्रभारी नेमले आहे. त्यांनी आपली 'टीम गोवा' तयार केली असून त्यात आता भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना आता घेण्यात आले आहे. त्यांच्यावर म्हापसा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाने टाकलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी सार्थ ठरविणार असल्याचे आमदार लांडगे यांनी शनिवारी (ता.१५) गोवा येथून 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्वत: गोवा निवडणुकीत लक्ष घातले आहे. गेल्या महिन्याच्या २२ तारखेला त्यांनी स्वत गोव्यात यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी माजी मंत्री आणि मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय यांना फडणवीस यांनी आपल्या गोवा टीममध्ये घेतले. त्यांच्यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साकोली या मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आता आमदार लांडगे यांनाही या 'गोवा टीम' मध्ये घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे म्हापसा या महत्वाच्या मतदारसंघाची धूरा सोपविण्यात आली आहे.

Bala Bhegade, Mahesh Landge, Chitra wagh
भाजप नेत्यांना पक्षात प्रवेश नाही! अखिलेश यादवांची मोठी घोषणा

या मतदारसंघातील तयारीचा आढावा आमदार लांडगे यांनी शुक्रवारी (ता.१४) घेतला. तर, शनिवारी (ता.१५) त्यांनी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याबरोबर त्याबाबत चर्चा केली. काल गोव्याला गेलेले आमदार लांडगे दोन दिवस तिथेच थांबणार आहेत. समन्वय बैठका घेणार आहेत. पुढील आठवड्यात पुन्हा गोव्याला जाणार असून दहा दिवस तळ ठोकून राहणार आहेत. तूर्त पक्षांतर्गत प्रचाराची रणनिती ठरविली आहे. आमदार लांडगे यांनी गोवा भेटीबाबत बोलताना सांगितले. उमेदवार निश्चितीनंतर प्रचाराला पुन्हा जाणार असल्याचे ते म्हणाले. तूर्त कोरोना निर्बंधामुळे फिजिकली प्रचारास गोव्यात बंधने आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आणि डिजीटल मार्केटिंगवर भाजपने सध्या भर दिलेला आहे.

Bala Bhegade, Mahesh Landge, Chitra wagh
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामांचे कधीही समर्थन करत नाही...

दरम्यान, आप आणि तृणमूल काँग्रेस यांनी यावेळी प्रथमच गोव्यात भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे टीम फडणवीसला भाजपने मैदानात उतरवले आहे. या टीममध्ये महाराष्ट्र भाजपमधील संघटन कौशल्य असलेले आणखी काही भाजप नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. त्या प्रत्येकाला एकेक मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे.

Bala Bhegade, Mahesh Landge, Chitra wagh
संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं? : फडणविसांनी उडविली खिल्ली

गोव्यात चाळीस मतदारसंघ आहेत. यावेळी तेथे शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याचीही चिन्हे आहेत. त्यात स्थानिक गोमंतक पक्षही आहे. एकूणच सध्या,तरी गोव्यात बहूरंगी लढती होतील,अशीच चिन्हे दिसत आहेत. येत्या सोमवारी (ता. १७) म्हापशासह इतर ठिकाणचे भाजपचे उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यानंतर फडणवीस यांच्या गोवा टीमच्या हालचाली आणखी तीव्र होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.