बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला मोठा धक्का : भोरच्या सभापतींचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर पंचायत समितीचे सभापती लहूनाना शेलार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
 NCP's Lahunana Shelar joins Congress
NCP's Lahunana Shelar joins CongressSarkarnama

नसरापूर (जि. पुणे) : बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे (Congress) आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का दिला आहे. भोर (Bhor) पंचायत समितीचे सभापती लहूनाना शेलार यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम करत राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) आणि आमदार थोपटे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. (Bhor Panchayat Samiti chairperson Lahunana Shelar joins Congress)

भोर तालुक्यातील वरवे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे अयोजन काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार संग्राम थोपटे होते. याच मेळाव्यात सभापती लहूनाना शेलार यांनी राष्ट्रवादीचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमास काँग्रेसचे सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, शैलेश सोनवणे, नाना राऊत, आण्णा भिकुले, कृष्णाजी शिनगारे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल आवाळे, स्वरुपा थोपटे, गीतांजली शेटे, गीता आंबवले, धनंजय वाडकर, रोहन बाठे, नितीन दामगुडे, राहुल लेकावळे, राजगडचे उपाध्यक्ष पोपट सुके व सर्व संचालक उपस्थित होते.

 NCP's Lahunana Shelar joins Congress
आषाढीच्या महापुजेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण!

शेलार म्हणाले की, मागील पाच वर्षांत पंचायत समितीमध्ये सदस्य, उपसभापती व सभापती म्हणून काम करत असताना जो त्रास पक्षामधूनच देण्यात आला, तो विरोधकांनीही कधी दिला नाही. आमच्या कुटुंबाने दिवंगत काशिनाथराव खुटवड यांना कायम साथ दिली. आम्हीदेखिल त्याच भुमिकेतून काम करत होतो; परंतु पक्षामध्ये कायम अपमानास्पद वागणूक देत घुसमट करण्यात आली. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व सर्वसामान्य कार्यकर्ते यांनी कायम साथ दिली. पण, मधल्या नेत्यांच्या फळीने कोणतेही कारण नसताना कायमच दुस्वास केला. त्याला कंटाळून पक्षभेद विसरून काम करणारे आमदार संग्राम थोपटे यांचे नेतृत्व स्वीकारुन आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

 NCP's Lahunana Shelar joins Congress
खोत, गर्जेच्या माघारीनंतरही काँग्रेस लढण्यावर ठाम; विधान परिषदेचा आखाडाही रंगणार!

मंत्री केदार यांनी लहुनाना शेलार व कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. काँग्रेस हा इतिहास असलेला पक्ष आहे. कितीही संकटे आली तरी काँग्रेस कार्यकर्ते डगमगत नाहीत. लोकनेता कसा असावा, हे संग्राम थोपटे यांच्याकडे पाहिल्यावर समजते. त्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा समर्थपणे पेलला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक अव्हाने असताना त्यांची काँग्रेसचा विचार ठाम ठेवला आहे, याची काँग्रेस पक्ष निश्चित दखल घेईल, त्यांचे भविष्य निश्चित चांगले आहे, असा विश्वास व्यक्त केला.

 NCP's Lahunana Shelar joins Congress
महाआघाडीत खडाखडी : राऊतांच्या आरोपाने राष्ट्रवादीचे नेते नाराज; पवारांकडे तक्रार!

आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, राज्यात अघाडी सरकार असताना भोर तालुक्यात निव्वळ आम्हाला विरोध म्हणून व्यक्तीदोषी राजकारण केले जाते. पण, आमचे सर्वांना बरोबर घेऊन जायचे धोरण असते, त्यामुळेच मागील काही दिवसात राष्ट्रवादीचे तीन नेते व आता लहुनाना शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लहुनाना शेलार कुटुंबीयांनी माजी आमदार खुटवड यांच्यासाठी जीवाचे रान केले; परंतु त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याने त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल. सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले, तर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in