Trupti Desai
Trupti Desai

तृप्ती देसाई यांची आता राजकारणाच्या मैदानात एन्ट्री

तृप्ती देसाई या रविवारी (ता.७) मराठी `बिग बॉस`मधून बाहेर पडल्या.

पिंपरी : महिलांवरील अन्याय व त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) या रविवारी (ता.७) मराठी `बिग बॉस`मधून बाहेर पडल्या. तेथून एक्झिट होताच लगेचच त्यांनी राजकारणातील `एंट्री`चे सुतोवाच केले. मात्र, कधी राजकारणात येणार हे त्यांचे अद्याप ठरलेलं नाही. तसेच कुठल्या पक्षात जाणार हे ही निश्चीत झाले नसल्याचे त्यांनी सोमवारी (ता.८) `सरकारनामा`ला सांगितले. अद्याप कुठल्या पक्षाकडून आमंत्रण आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बिग बॉस स्पर्धेतून जे मानधन तथा बक्षीस मिळेल, ते आपण यावर्षी ८ मार्चला जाहीर केलेल्या बलात्कारमुक्त महाराष्ट्र या अभियानासाठी देणार असल्याची घोषणा देसाई यांनी केली आहे. कोरोनामुळे ब्रेक लागलेली ही मोहीम पुन्हा जोरात सुरु करणार आहे. त्यासाठी गावागावात, घरांघरांत जाऊन जनजागृती करणार आहे. महिलांनी अन्याय सहन करू नये, असे मी त्यांना सांगणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Trupti Desai
आक्रित घडलं! इंधनावरील कर कमी करण्यासाठी भाजपनंच केलं आंदोलन

महिलांच्या मंदिर प्रवेशबंदी विरोधात त्यांनी शबरीमला येथे जाऊन आंदोलन केले होते. तसेच किर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या महिलाविषयक वादग्रस्त वक्तव्यावर कठोर भूमिका घेतल्याने सुद्धा त्या चर्चेत आल्या होत्या. एकूणच वादग्रस्त सामाजिक कार्यकर्त्या अशी प्रतिमा असलेल्या देसाई पन्नास दिवस बिग बॉसच्या घरात राहूनही वाद न ओढवून घेता बाहेर पडल्या हे विशेष. या स्पर्धेत भाग घेतल्याचा फायदा झाला. कारण या कालावधीत आपल्याविषयी असलेले गैरसमज दूर होण्यात मदत झाली. आपल्याला ट्रोल करणे कमी झाले, असे त्या म्हणाल्या. तसेच शाळा व त्यातही कॉलेजात असताना टॉमबॉय अशी प्रतिमा होती. त्या आठवणींना बिग बॉसमुळे उजाळा मिळाला, असे त्यांनी सांगितले.

Trupti Desai
काँग्रेसला धक्का; माजी मुख्यमंत्र्यांच्या आमदार पुत्रासह दोघांचा भाजपमध्ये प्रवेश

आपल्याला महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करायचे आहे, असे सांगत त्यांनी स्थानिक म्हणजे महापालिका निवडणुकीतून आपला राजकारणात प्रवेश होणार नाही, हेच जणू काही देसाई यांनी सूचित केले. तसेच सत्तेत असल्याशिवाय समाजकामे लवकर होत नसल्याचे आपल्या दौऱ्यांतून दिसून आल्याने राजकारणात जाण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी पक्षांत की केंद्रातील भाजपमध्ये जाणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

त्याचवेळी आता कुठे काही तासांपूर्वी राजकारणात जायची घोषणा केली असल्याने लगेचच कुठल्या पक्षाकडून अद्याप बोलावणे आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच राजकारणात येणार म्हणजे कधी येणार असे विचारले असता योग्यवेळी तो निर्णय घेऊ, असे सावध उत्तर त्यांनी दिले. आपले विचार जुळतील, पटतील त्या पक्षात जाणार असल्याचे संकेत मात्र त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com