Bhima-Patas Sugar Factory : नेत्यांच्या हातापाय पडलो अन्‌ कारखाना चालू केला, विकला तर नाही ना? : कुल-ताकवणेंमध्ये तू तू-मैं मैं

ताकवणे, तुम्ही कारखान्याला ऊस देत नाही; परंतु तुम्ही अडथळा आणला म्हणून कारखाना दीड महिना उशिराने सुरू झाला आहे.
Rahul Kul- Namdev Takawane
Rahul Kul- Namdev TakawaneSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : भीमा पाटस साखर कारखान्याच्या (Bhima Patas sugar factory) वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपचे (BJP) आमदार राहुल कुल (Rahul Kul) व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे (Namdev Takawane) यांच्यात खडाजंगी झाल्याने वातावरण काही काळ तापले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मात्र या सभेपासून दूर राहणे पसंत केले. कारखाना खासगी संस्थेला भाडेतत्वावर चालवायला दिल्याबद्दल विरोधकांनी कुल यांनी जाब विचारला. अनेक दिव्यातून जाऊन कारखाना चालू केला आहे; विकला तर नाही ना, असा सवाल कुल यांनी उपस्थित केला. (Bhima Patas sugar factory started, we don't sell it : Rahul Kul)

भीमा पाटस साखर कारखाना तीन वर्षे बंद होता. यंदा तो चालू झाला आहे. कारखान्याची वार्षिक सभा आज कुल यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर पार पडली. सभा ७० मिनिटे चालली. आमदार कुल यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, कर्नाटकातील भाजपचे मंत्री मुरूगण निराणी यांनी कारखाना चालू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. कुल यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ पहायला मिळाली.

Rahul Kul- Namdev Takawane
Someshwar Sugar Factory : महिला मंत्र्यांवरून शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल करणाऱ्या अजितदादांनी ‘सोमेश्वर’मध्ये करून दाखवलं!

कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी विषय वाचन केले. विषय वाचन चालू असताना एक एक विषय मंजूर होत चालला होता. मात्र, विषय क्रमांक तीन आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने त्याला नामदेव ताकवणे यांनी हरकत घेत बोलू देण्याची मागणी केली. त्यावर कुल म्हणाले की, विषय वाचन झाल्यावर सर्वांना बोलू दिले जाईल. हा मुद्दा ताकवणे व शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम यांना मान्य नव्हता. त्यावरून सभेत तू तू मैं मैं झाले. कारखाना सुरू झाला; म्हणून कुल यांनी फुशारकी मारू नये, असा टोला ताकवणे यांनी मारला.

Rahul Kul- Namdev Takawane
Assembly Session News: आम्ही रेशीम बागेत गेलो; गोविंद बागेत नाही गेलो : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

कुल म्हणाले की, भीमा-पाटस साखर कारखाना चालवायला निराणी ग्रुपला १५० कोटी रूपये एकरकमी भरावे लागले. सुमारे १५० कोटी रूपये देऊनही कारखान्यावर त्यांची मालकी नाही. दोन नवीन कारखाने १५० कोटीत उभे राहतात. दीडशे कोटी रूपये भाषणे ठोकून, अर्ज करून मिळत नाही. त्यासाठी आम्ही आमचे राजकीय अस्तित्व पणाला लावले. नेत्यांच्या हातापाया पडलो. कारखाना चालूच केला. विकला तर नाही ना. कायदेशीर चौकटीत बसल्यामुळे लोकशाही मार्गाने कारखाना चालू केला आहे. ताकवणे तुम्ही कारखान्याला ऊस देत नाही; परंतु तुम्ही अडथळा आणला म्हणून कारखाना दीड महिना उशिराने सुरू झाला आहे. पुतणा मावशीचे प्रेम बंद करा. अध्यक्ष म्हणून कारखाना चालू करणे, ही माझी जबाबदारी होती. ती मी पार पाडली आहे.

Rahul Kul- Namdev Takawane
Eknath Shinde News: त्यावेळी ‘वर्षा’वर पाटीभर लिंबं सापडली होती : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, शिवाजी नांदखिले, तानाजी दिवेकर, वसंत साळुंखे, अरविंद गायकवाड, हरिदास लाळगे, अशोक नागवडे, अरूण आटोळे, विठ्ठल दोरगे, अनिल पोमणे, जितेंद्र नेमाडे, तुकाराम कोडीतकर यांनी चर्चेत भाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com