Bhima Koregaon Shouryadin : करणी सेनेला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर ; म्हणाले...

शौर्य दिनावर आणि त्या दिवशी होणाऱ्या शासकीय कामांवर बंदी घालावी, तेथील विजय स्तंभ काढून टाकावा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी केली होती
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar: '' चातुर्वण्यामुळे देश गुलाम झाला. त्यांच्यात असलेला क्षत्रिय हा लढाऊ होता. तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, असा समज होता. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्यानी विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय सेंगर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकाश आंबेडकर हे कोरेगाव-भीमा येथे बोलत होते आज सकाळीत त्यांनी कोरेगाव-भीमा येथील शौर्यस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजय सेंगर यांना उत्तर दिले आहे. '' दरवर्षी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन साजरा केला जातो. पण या शौर्य दिनावर आणि त्या दिवशी होणाऱ्या शासकीय कामांवर बंदी घालावी, तेथील विजय स्तंभ काढून टाकावा, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी केली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच, १ जानेवारीला भीमा कोरेगावला जाऊन शौर्य दिनाला विरोध करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Prakash Ambedkar
Jorgewar : आमदार जोरगेवारांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिला ‘हा’ शब्द !

दरम्यान, भिमा-कोरेगाव विजयस्तंभाला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव शौर्यदिनानिमित्त आज हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. २०१८ प्रमाणे भीमा-कोरेगाव परिसरात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

'' १ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या सैन्यात मोठी लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या महार सैनिकांनी ही लढाई जिंकली. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष आजही दलित समाज मोठ्या प्रमाणात साजरा करतो. पण त्या काळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानले जात असे. त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in