Bhima Koregaon : "सरकारच पेशवाईचं असेल, तर मंत्री भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन का करतील?"

Sushma Andhare : "आताचं सरकारच पेशवाईचं, आम्ही कशी काय अपेक्षा करावी?"
Bhima Koregaon
Bhima KoregaonSarkarnama

Bhima Koregaon : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करणी सेनेबाबत प्रतिक्रीया दिली आहे. "करणी सेनेसारख्या चिल्लर सेनेबाबत आपल्याला काही बोलायचं नाही. मात्र या मागचे बोलविते धनी आरएसएस आणि सरकारात असलेला भाजपच आहे” असा थेट आरोप अंधारेंनी लावले. आज रविवार (१ जानेवारी) कोरगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन अर्पण करण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या होत्या, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“करणी सेनेच्या मागे, बोलविते धनी कोण असेल तर ते आरएसएस आणि भाजपच आहे. मात्र आपल्याला करणी सेनासारख्या चिल्लर सेनेबाबत मला काही बोलायचं नाही. भाजपामधील किमान एखाद्याच जबाबदार व्यक्तिने करणी सेनेसारखी भूमिका बोलवूनच दाखवावी. मग आंबेडकरी जनता काय असते, हे दाखवलं जाईल," असे आव्हानच अंधारे यांनी दिले.

Bhima Koregaon
CM Shinde : जाऊद्या ना ते आता कशाला बोलता? अजितदादांविषयी प्रश्न विचारताच मुख्यमंत्री असं का म्हणाले..

सरकारच पेशवाईचं असेल, तर आम्ही काय अपेक्षा करावी, या ठिकाणी राज्य सरकारमधील कोणीही मंत्री येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित नाहीत, या प्रश्वावर अंधारे म्हणाल्या, सरकारमधील मंत्री येणं, अपेक्षितच नाही.

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात आधी पालकमंत्री म्हणून अजित पवार या ठिकाणी येऊन अभिवादन करत असत. पण आताचं सरकारच पेशवाईचं आहे, तर या पेशवाईकडून आम्ही कशी काय अपेक्षा करावी.”“ज्या पेशवाईचा पाडाव केल्यानंतर, हा विजय स्तंभ उभा राहिला, त्या पेशवाईचाच वसा अन वारसा चालविणारे लोकच जर या सरकारमध्ये असतील, तर त्यांनी इथे अभिवादन करण्याची अपेक्षा फोल ठरणार आहे,” अशा शब्दात अंधारे यांनी घणाघात केला.

Bhima Koregaon
Jitendra Awhad : ‘ही तीन वर्षे कायम लक्षात राहतील : आणखी किती ठिकाणी अडकविले जाईल, सांगता येत नाही’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in