मोठी बातमी : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंसह पाच पक्षप्रमुखांना समन्स

(Bhima Koregaon Case news update) पाचही पक्षप्रमुखांना 30 जून पर्यंत आपलं म्हणणं अॅफेडेव्हिटच्या माध्यमातून मांडावे लागणार आहे.
Bhima Koregaon Violence Latest News
Bhima Koregaon Violence Latest NewsSarkararnama

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांना भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगाने समन्स बजावलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष आयोगाने नोंदवल्यानंतर आता आयोगानं पक्षप्रमुखांना समन्स बजावलं आहे, तीस जूनपर्यंत आपलं म्हणणं माडण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Bhima Koregaon Case news update)

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरू आहे.

Bhima Koregaon Violence Latest News
मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे 'चला हवा येऊद्याचा प्रयोग' ; मनसेचा हल्लाबोल

आयोगाकडून आतापर्यंत राज्यातील महत्त्वाच्या पाच पक्षप्रमुखांना समन्स जारी करण्यात आलं आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या पक्षप्रमुखांना आयोगाने समन्स बजावलं आहे. या पाचही पक्षप्रमुखांना 30 जून पर्यंत आपलं म्हणणं अॅफेडेव्हिटच्या माध्यमातून मांडावे लागणार आहे.आयोग त्यानंतर या पाचही पक्षप्रमुखांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवायचं किंवा नाही, यावर निर्णय घेणार आहे.

भीमा कोरेगाव काय आहे प्रकरण?

  • 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती.

  • भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

  • तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनं संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

  • शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा या प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचे पोलीसांनी न्यायालयात सांगितलंय.

  • राज्य मानवी हक्क आयोगालाही त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पाच पक्षप्रमुखांना समन्स जारी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com