Sudhir Mungantiwar News : शिवराज्याभिषेक दिनापासून राज्यात सुरू होणार 'भवानी तलवार' दर्शन यात्रा

Maharashtra News : '' लवकरच भवानी तलवार महाराष्ट्रात आणण्यात येणार...''
Sudhir Mungantiwar News, bhavani Talwar
Sudhir Mungantiwar News, bhavani Talwar Sarkarnama

Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार ' भवानी तलवार' पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. भाजपचे नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज(दि.१८) पुण्यात सुरू आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेली भवानी तलवार इंग्लंडवरून आणण्याचा करार अंतिम टप्प्यात आला आहे अशी माहिती दिली आहे.

लवकरच भवानी तलवार महाराष्ट्रात आणण्यात येणार असून पुढील काळात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात भवानी तलवार यात्रा काढण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar News, bhavani Talwar
BJP state executive meeting : निवडणुकांच्या तोंडावर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची होणार चांदी; पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

छत्रपती शिवाजी महाराजां(Chhatrapati Shivaji Maharaj)च्या राज्याभिषेकाला सहा जून रोजी 350 वे वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यभरात यात्रा काढण्यात येणार असून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ही भवानी तलवार यात्रा नेण्यात येणार आहे. याशिवाय राजा शिवछत्रपती हे बाबासाहेब पुरंदरे लिखित नाटक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चार शो दाखविण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इतिहासाला सहा जून रोजी 349 वर्ष पूर्ण होऊन 350 वर्ष सुरू होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारने हा विशेष कार्यक्रम आखला आहे. भवानी तलवारीच्या दर्शन राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला घेता यावं यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Sudhir Mungantiwar News, bhavani Talwar
Tahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा 'मास्टरमाईंड' तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

सध्या तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात...

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळं 'जगदंबा तलवार' पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. तसंच, २०२४ पर्यंत शिवरायांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पाठपुरावा करु असे संकेत त्यांनी दिले आहे.''भवानी तलवार' ही आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली आहे. ही तलवार महाराष्ट्राला परत करावी असं पत्र आम्ही केंद्राला पाठवलं आहे. तसंच,ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही आम्ही विनंती करणार असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in