तुमच्याही गाड्या फुटतील : भरत गोगावले यांचा थेट इशारा

Attack on Uday Samant : शिवसेना विरुद्ध शिंदे गट वाद पेटण्याची शक्यता
Bharat Gogavale
Bharat GogavaleSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याने शिंदे गटाचे नेते संतापले आहेत. गटाचे नेते भरत गोगावले यांनी तुमच्याही गाड्या आहेत, असा इशारा हल्लेखांना दिला आहे.

हल्लेखोर कोण आहेत, याचा शोध पोलिस नक्की घेतील. कोणीही परत असे कृत्य करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Bharat Gogavale
उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला : आदित्य यांच्या सभेनंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक

शिवसेनेचे हिंगोली संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी गद्दारांच्या गाड्य फोडा, तुम्हाला मातोश्रीवर घेऊन जातो, असा इशारा काल हिंगोली येथे बोलताना दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उदय सामंत यांच्यावर आज पुण्यातील कात्रज हल्ला झाला. या प्रकारावरून भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. प्रसाद लाड यांनीही या हल्ल्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.

दुसरीकडे बबनराव थोरात यांनी या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देवमाणासाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जनतेत असंतोष आहे. सामंत यांच्यावरील हल्ला ही जनतेतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया आलेली आहे, असा दावा केला. उदय सामंत यांच्यावरील हल्ला हा जिवघेणा नव्हता, अशीही सारवासारव त्यांनी केली.

Bharat Gogavale
Attack on Uday Samant : परमेश्वर कृपेने मी वाचलो...पण पाळेमुळे शोधून काढू!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आज दोघेही पुण्यात होते. शिंदे यांच्यासोबत आज दिवसभर सामंत होते. आदित्य यांची कात्रज चौकातील सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत होते. त्याच वेळी सामंत यांच्या गाड्याचा ताफा कात्रज चौकात सिग्नलवर थांबले होता. सामंत यांची गाडी दिसताच शिवसैनिकांनी गाडीवर लाथा मारल्या. शिवीगाळ केली. दगडफेक केली. त्यानंतर सामंत हे कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com