अजित पवारांनी शब्द खरा केला; भालचंद्र जगताप यांना दिली मोठ्या पदावर संधी!

जिल्हा पातळीवरील नेते आल्याशिवाय भोर तालुक्यातील एकत्र न येणारे नेते भालचंद्र जगताप यांना पद मिळाल्याचा आनंद सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला.
Bhalchandra Jagtap-Ajit Pawar
Bhalchandra Jagtap-Ajit PawarSarkarnama

नसरापूर (जि. पुणे) : भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, भालचंद्र जगताप (Bhalchandra Jagtap) यांची पुणे (Pune) जिल्हा सहकारी बँकेवर (District Bank) तज्ज्ञ संचालक म्हणून पुन्हा निवड झाली आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी डावलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भविष्यात जगताप यांना संधी देण्यात येईल, असा शब्दा दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला आहे. तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येत आज (ता. ११ नोव्हेंबर) विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेत जगताप यांच्या निवडीबद्दल आभार मानले. (Bhalchandra Jagtap has been appointed as expert director of Pune District Co-operative Bank)

तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भालचंद्र जगताप यांना पुन्हा कामाची संधी मिळाली आहे. जगताप हे भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. त्यांचे तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांशी चांगले संबध आहेत. जिल्हा बँकेच्या झालेल्या निवडणुकीत त्यांना डावलल्यावर अजित पवार यांच्याकडे भोर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची शिफारस संचालक पदासाठी करण्यात आली होती. त्यांच्या शिष्टाईला यश येत तसेच अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा करत बँकेच्या संचालक मंडळाच्या १० नोव्हेंबरच्या बैठकीत तज्ज्ञ संचालकपदाच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

Bhalchandra Jagtap-Ajit Pawar
राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी फरारी; विनयभंगाचा जाब विचारणाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत अजित पवार यांची कामशेत (ता. मावळ) येथील कार्यक्रमात भेट घेत आभार मानले. या वेळी अजित पवार यांच्या हस्ते भालचंद्र जगताप यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भोर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा नियोजन सदस्य विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, मानसिंग धुमाळ, गणेश खुटवड, गणेश निगडे, मनोज खोपडे, केतन चव्हाण, सचिन पाटणे, हनुमंत पवार, स्वप्निल कोंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Bhalchandra Jagtap-Ajit Pawar
पालघरमधील चार पंचायत समित्यांवर शिवसेना-राष्ट्रवादीची बाजी; भाजप-शिंदे गटाला प्रत्येकी एक समिती

जिल्हा पातळीवरील नेते आल्याशिवाय भोर तालुक्यातील एकत्र न येणारे नेते भालचंद्र जगताप यांना पद मिळाल्याचा आनंद सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. आगामी काळातही या नेत्यांनी अशी एकी दाखवल्यास तालुक्यात राष्ट्रवादी मजबुत होईल. त्यामुळे देव करो व ही एकी कायम राहो, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com