Sharad Pawar : ''भगतसिंह कोश्यारी गेले ते बरे झाले, पदाची प्रतिष्ठा वाढविण्यात ते अपवाद ठरले''

Politics : शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारींना मारली कोपरखळी
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

पिंपरी : महापुरुषांबाबत वारंवार केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारींना बदलण्य़ाच्या जोरदार मागणीनंतर नुकतेच त्त्यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात आले. त्यावर राज्यपालपदाची प्रतिष्ठा वाढविण्यात कोश्यारी हे अपवाद ठरले, अशी कोपरखळी शरद पवार यांनी आज चिंचवडमध्ये मारली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार सभेनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार यांनी माजी राज्यपालांना हा टोला लगावला. तसेच ते गेल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. ''मी पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हापासूनच्या इतिहासात आजपर्यंत अनेक राज्यपाल महाराष्ट्रात येऊन गेले''.

Sharad Pawar
Sharad Pawar : देशात दुही माजवल्यानंतर भाजपचा आता राजकीय पक्षांवरही हल्ला; पवारांचा घणाघात

''त्या प्रत्येकाने या पदाची प्रतिष्ठा वाढवली. अपवाद केवळ कोश्यारी ठरले'', असे ते म्हणाले. चिंचवडमध्ये आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. त्यावर भाष्य करताना, मागील ५०-६० वर्षांच्या माझ्या राजकीय अनुभवात ऐनवेळेस अशी बंडखोरी करणाऱ्यांची काही वेळ वर्तमानपत्रात चर्चा होते.

Sharad Pawar
Sanjay Shirsat News : शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर, त्यावर दावा कसा सांगणार ?

पण मतांच्या परिवर्तनामध्ये ते हळूहळू खाली जातात, असे पाहिले आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अपक्षांची झालेली चर्चा आता खाली आलेली दिसते. ते नावही लोकांपुढे हळहळू आहे की नाही या स्थितीत जाऊन पोहचते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यामुळे ही निवडणूक केवळ भाजप विरूद्ध आघाडी अशीच होईल, असे ते म्हणाले.

Sharad Pawar
Bawankule on Pawar : पवारांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीस नको होते, हीच खरी अडचण होती; बावनकुळेंचा मोठा दावा

चिंचवडचे चित्र बदलाला अनुकूल आहे असे दिसते. याची कारणे काय ही माहिती माध्यमांनी लोकांना दिली पाहीजे. नेत्यांच्या गर्दीतून निवडणूक जिंकता येते असा अनुभव मला नाही. मर्यादित लोकांवर लक्ष केंद्रीत केले तर निवडणूक जिंकता येते. ही सगळी गर्दी जनमानसात किती प्रभावी आहे हे जास्त महत्त्वाचे असते, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com