Bhagat Singh Koshyari : राज्यपाल 'या' वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत ; महिलेनं त्याचं भाषण थांबवलं..

Bhagat Singh Koshyari : कोश्यारी भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारी यांचं भाषण थांबवत त्यांना ..
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Sarkarnama

Bhagat Singh Koshyari : आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) पुन्हा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. कोश्यारी हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलं आहे. (Bhagat Singh Koshyari news updare)

पुण्यातील विमाननगर परिसरात एका कार्यक्रमात भाषण करताना राज्यपालांनी हे विधान केलं. या कार्यक्रमात कोश्यारी भाषणासाठी उभे राहिले. भाषण सुरू होताच एका महिलेने उभे राहून राज्यपाल कोश्यारी यांचं भाषण थांबवत त्यांना 'राज्यपाल तुम्ही आम्हाला दिसत नाहीत', असे म्हणत तक्रार मांडली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

Bhagat Singh Koshyari
Alpesh Thakor : पोटनिवडणूक हरलेल्या उमेदवाराचा त्याच मतदारसंघातून पुन्हा विजय

आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, "मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ,' असे राज्यपालांनी त्या महिलेला सांगितले. कोश्यारींचे भाषण सुरू असताना त्यांच्या समोरील बाजूला छायाचित्रकारांना रेकॉर्डिंग करीत उभे होते. त्याचे मागे ती महिला बसली होती. छायाचित्रकारांमुळे त्या महिलेला राज्यपाल दिसत नव्हते.

त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली होती. या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज याच्याबाबच वादग्रस्त विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राज्यापालांना परत बोलवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अद्याप राज्यपालांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शिवप्रेमी संघटनांकडून महाराष्ट्रभर बंद (Maharashtra) पाळण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही 17 डिसेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. अशातच कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com