ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वी नेते मैदानात : वसंत मोरेंची महाआरती; बाबर यांचा पोलिसांना इशारा

Raj Thackeray | MNS : नाराजी दुर! अखेर वसंत मोरे मैदानात
Vasant More and Raj Thackeray
Vasant More and Raj Thackeray Sarkarnama

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच पुण्यातील मनसेचे नेते अ‍ॅक्टिव्ह होवून मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून नाराज असलेले मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) आज हनुमान मंदिरामध्ये महाआरती करणार आहेत. तर मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पुणे शहरातील बहुतांश मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे तातडीने उतरवावेत, अन्यथा पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणू,असा इशारा दिला आहे.

Vasant More and Raj Thackeray
"स्टंम्प्सच्या मागून बॅट्समनच्या विकेट काढायला आवडतात" : राऊतांनी गाजवलं क्रिकेटचे मैदान

वसंत मोरे हे कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात आज संध्याकाळी ६ वाजता महाआरती करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या मंदिराबाहेर स्टेजही उभारण्यात आले आहे. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे माहिती दिली. ते म्हणाले, मी तीन दिवस तिरुपती बालाजीला असल्याने आरतीचे नियोजन झाले नव्हते. पण आज शनिवार असल्याने आणि पोलिसांनी देखील परवानगी दिल्याने महाआरतीचे नियोजन केले आहे. दरम्यान मोरे यांच्या या महाआरतीला राज ठाकरे उपस्थिती लावणार का यावर सगळ्यांचं लक्ष्य असणार आहे.

तर शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वात अजय शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे आणि बाळा शेडगे यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेवून एक निवेदन सादर केले आहे. यात पुणे शहरात ४०० ते ४५० मशिदी आहेत. त्यातील जवळपास सर्वच मशिदींवरील भोंगे अनधिकृत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे उतरवावेत किंवा कायमस्वरूपी बंद अवस्थेत ठेवावेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी मौलवींना पोलिसांच्या माध्यमातून तशी ग्वाही द्यावी. अन्यथा पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणण्यात येईल, असाही इशारा यात देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in