मुख्यमंत्री शिंदे यांच्याआधी शिवसेना करणार पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती !

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचा गट आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
Eknath Shinde-uddhav thackeray
Eknath Shinde-uddhav thackeraysarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) येत्या एक ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत पुणे दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. मात्र. त्याआधीच शिवसेनेकडून त्यांना आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (२६) शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे.

Eknath Shinde-uddhav thackeray
अजितदादा संतापले : इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण कधी पाहिलं नाही..`

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेने गेल्या चार दिवसात बंडखोर खासदार व आमदारांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून शिवसेना नेत्यांचा उत्साह वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील महाआरतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने आज दुपारी महारती करण्याची घोषणा करण्यात आली. याला विशेष महत्त्व आहे

Eknath Shinde-uddhav thackeray
रामदास आठवलेंचे भाकीत : उद्धव ठाकरेंचा गट भविष्यकाळात अत्यंत क्षीण होत जाईल

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे-मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि आता खासदारदेखील शिंदे गटात सहभागी होत आहेत. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्याची योजना आखली आहे. येत्या काही दिवसात पुण्यात मेळावा होणार आहे. त्याआधीच हा शासकीय दौरा जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्यात पुण्यातील आणखी काही शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाआरती आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde-uddhav thackeray
एमपीएससी आणि पोलिसांच्या दबावानंतर विद्यार्थ्यांची माघार; राष्ट्रवादी उतरली मैदानात

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात अनेकजणांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची वाट धरली आहे. मात्र, येत्या काही दिवसात यापेक्षाही मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ पुणे नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून येणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यामुळे पाहता येत्या काही दिवसात पुण्यात एक मोठा मेळावा घेऊन पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात प्रवेश देऊन शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी मंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शरद सोनवणे, शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे, युवासेनेचे किरण साळी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात गेल्या चार दिवसात प्रवेश केला आहे. पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसात शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची ही काही मोजकी नावे आहेत. मात्र, या पुढच्या काळात शिवसेनेतल्या शहर आणि जिल्हा पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in