Baramati Dudh Sangh Eelection : अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती दूध संघाची निवडणूक जाहीर; बिनविरोधची परंपरा कायम राहणार?

राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह इच्छुकांनी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या निवड प्रक्रियेत बाजी मारणारा दूध संचालक होणार, हे काळ्या दगडावरची रेष आहे.
Baramati Dudh Sangh Eelection
Baramati Dudh Sangh EelectionSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : विरोधी पक्षनेते अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल आज (ता. २७ मे) अखेर वाजला. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून बारामती दूध संघाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. तीच परंपरा या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. (Baramati Taluka Cooperative Dudh Sangh Election Announced)

पुण्याचे सहायक निबंधक (सहकारी संस्था दुग्ध, पुणे) सुधीर खंबायत यांनी आज बारामती (Baramati) दूध संघाच्या (Dudh Sangh) पंचवार्षिक निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहिर केला. या निवडणुकीद्वारे २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी १९ संचालक मंडळ निवडले जाणार आहेत. येत्या सोमवारपासून (ता. २९ मे) शुक्रवारपर्यंत (ता. २ जून) उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी (ता. ५ जून) होणार आहे. वैध उमेदवारी अर्जाची यादी मंगळवारी (ता. ६ जून) जाहिर होणार आहे.

Baramati Dudh Sangh Eelection
Baramati News : पळशीच्या माजी सरपंचांची बातच न्यारी : वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा देत बारावीत पटकावला प्रथम क्रमांक

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार (ता.६ ते २० जून) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच्या कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवार (ता. २१ जून) रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, तसेच त्याचदिवशी संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येईल. मतदान रविवारी (ता. २ जुलै) होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत अधिकृतरित्या १९३ मतदार संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Baramati Dudh Sangh)

Baramati Dudh Sangh Eelection
Nashik Bazar Samiti : बहुचर्चित नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा : देविदास पिंगळे सभापती, तर उपसभापतीपदी खांडबहाले

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या या दूध संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) नेतेमंडळींसह इच्छुकांनी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे या निवड प्रक्रियेत बाजी मारणारा दूध संचालक होणार, हे काळ्या दगडावरची रेष आहे.

Baramati Dudh Sangh Eelection
Gajanan Kirtikar News : गजाभाऊ किर्तीकर आम्हाला सोडून जाणं, हे फार वेदनादायी होतं : शिवसेना खासदाराने बोलून दाखवली व्यथा

संदीप जगताप दहा वर्षांपासून अध्यक्ष

बारामती दूध संघाच्या सुरवातीच्या पहिल्या वर्षी (२०१६ ते २०१७) सतिश तावरे यांना अध्यपदावर, तर उपाध्यक्षपदावर वैभव मोरे यांना काम करण्याची संघी मिळाली होती. त्यानंतर सलग सहा वर्षे संदीप जगताप अध्यक्ष, तर राजेंद्र रायकर उपाध्यक्ष आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू झाल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com