बारामतीत 'कही खुशी, कही गम'; नगरपालिकेचे आरक्षण जाहीर

अनेकांनी प्रभाग निश्चित करुन नगरसेवकपदासाठी फिल्डींग लावण्यास प्रारंभ केला आहे.
Baramati municipal elections
Baramati municipal electionssarkarnama

बारामती : बारामती नगरपालिकेच्या (Baramati municipal elections) आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण(Reservation) जाहीर झाले.आगामी पाच वर्षात बारामती नगरपालिकेत महिला सदस्यांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असेल. (Baramati municipal elections news)

या सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करुन नगरसेवकपदासाठी फिल्डींग लावण्यास प्रारंभ केला आहे. या सोडतीमधून काहीना दिलासा तर काहींचे वॉर्ड राखीव झाल्याने कही खुशी, काही गम असेच वातावरण आहे.

आज जाहीर झालेल्या 41 जागांपैकी तब्बल 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पुरुषांना 20 जागा मिळणार आहेत. शासनाने धोरण बदलले असल्यामुळे नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, त्यामुळे नगरसेवकांच्या मताला अधिक किंमत प्राप्त होणार आहे. एक ते 19 या प्रभागात दोन नगरसेवक तर शेवटच्या विसाव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील.

Baramati municipal elections
शरद पवार राष्ट्रपतींच्या खूर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल!

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. आज जाहीर झालेल्या आरक्षणा मध्ये 20 प्रभागातील 41 जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले.

प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे.

  • प्रभाग 1 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग दोन सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 3 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 4 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 5 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 6 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 7 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 8 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 9 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण

  • प्रभाग 10 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण

  • प्रभाग 11 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण

  • प्रभाग 12 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 13 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 14 अनुसूचित जाती व सर्वसाधारण(महिला)

  • प्रभाग 15 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 16 अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिल

  • प्रभाग 17 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 18 अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला)

  • प्रभाग 19 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण

  • प्रभाग 20 अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण (महिला)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com