
Supriya Sule : राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी, सामान्यांचे नुकसान होत आहे, आता त्यांचा फटका राजकीय नेत्यांनाही बसला आहे. पुण्यात तीन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुककोंडी होऊन वाहनाच्या रांगा लागत आहेत. या वाहतुककोंडीचा फटका गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule)यांना बसला.
सुप्रिया सुळे आज बारामती येथून सासवडमार्गे सुप्रिया सुळे या पुण्यात येत होत्या.पुणे-सोलापूर रस्त्यावरुन प्रवास करीत असताना त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. वाहने पुढे सरकत नसल्यामुळे अखेर त्या खाली उतरल्या. त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर असलेल्या वाहतूककोंडीत त्यांची गाडी अडकली होती. त्यांना पुण्यातील बैठकीला उपस्थित राहायचे होते.
हडपसर ते सासवड या पालखी महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुळे यांनी गाडीतून उतरुन वाहनचालकांशी संवाद साधला.काही वेळानंतर वाहतुक काहिशी सुरळीत झाली. त्यातून मार्ग काढत त्या मार्गस्थ झाल्या. जाताना सुळेंनी "सांभाळून जा,"असा सल्ला दिला.
"हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी 'टॉप प्रायोरिटी'वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते.आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते," असे सुळे यांनी टि्वट केले आहे.
"केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे.कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा," असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.