माळेगाव गोळीबार प्रकरणी पुन्हा गुंतागुंत : मोक्कातून सुटलेल्या जयदिप तावरेंचा जामीन रद्द

न्यायालायत हजर होण्याचा आदेश
Jaydeep Taware
Jaydeep Taware

माळेगाव :  माळेगाव (जि. पुणे) येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावरील गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप तावरे (Jaydeep Taware) यांचा सहभाग नसल्याचा बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेला अहवाल मोक्का न्यायालयाने (MOCCA Court Baramati) आज फेटाळून लावला. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या जयदीप यांनी शरण यावे व बुधवार (ता. १८) रोजी त्याला न्यायालयात हाजर करावे, असे आदेश न्यायाधिश जी. पी. आगरवाल यांनी पोलिसांना दिले. परिणामी जयदीप यांच्या अडचणीत  वाढ झाली आहे. दोन्ही गट हे राष्ट्रवादीचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत हा चर्चेचा विषय ठरली आहे. 

या प्राप्त स्थितीचा विचार करता माळेगावच्या गोळीबार प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतल्याचे स्पष्ट होते. रविराज तावरे यांच्या बाजूने अॅड. योगेश पवार, अॅड. विश्वास खराबे, अॅड. विपुल अंदे, अॅड.सुलेमान शेख यांचा युक्तवाद न्यायालयात महत्वपुर्ण ठरला. दुसरीकडे, मात्र जामीन नाकारलेले जयदीप तावरे यांनी मोक्का न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाण्याची तयारी केल्याचे सांगण्यात आले.

माळेगाव बुद्रूक येथे ३१ मे रोजी राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर जीव घेणा गोळीबार झाला होता. त्या प्रकरणी माळेगावातील प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर खुन करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. परंतु संबंधित आरोपींची याआगोदरची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेवून पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली. दरम्यानच्या कालावधीत रविराज तावरे रुग्णालयात उपचार घेताना त्यांनी पोलिसांना जयदीप तावरे गोळीबाराच्या कटात सहभागी असल्याचा जबाब दिला. या जबाबावरून पोलिसांनी जयदीप तावरे यांच्यावर कटात सहभागी असल्याचा  गुन्हा दाखल करीत अटक केली होती.

अर्थात मोक्कांतर्गत जयदीपवर कारवाई झाल्याचे कळतात गावातील वातावरण चांगलेच तणावाचे झाले होते. जयदीप यांच्या समर्थनार्थ गाव बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली होती. रविराज तावरे यांनी राजकीय हेतूने जयदीप यांना गोवल्याचा आरोप करीत तसे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. पोलिसांनीही त्यानुसार गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर जयदीप यांचा या प्रकरणी संबंध नसल्याचा अहवाल २१ जुलै रोजी मोक्का न्यायालयात सादर केला. या अहवालामुळे जयदीप यांना जुलैल अखेरीस जामीन मंजूर झाला होता. परंतु आता मोक्का न्यायालयानेच पोलिसांनी दिलेला अहवाल अमान्य केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com