Pratik Jarad
Pratik JaradSarkarnama

UPSC Result 2023 : बारामतीला मिळाला पहिला 'आयएएस' अधिकारी; प्रतिक जराडची उत्तुंग भरारी

Baramati First IAS : पाचव्या प्रयत्नात स्वप्न केले साकार

UPSC Result 2023 : बारामतीची काही वर्षांपासून शिक्षणाचे हब म्हणूनही राज्यात ओळख निर्माण झाली आहे. येथे राज्यासह देशातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. असे असले तरी बारामती तालुक्यातून आतापर्यंत एकही 'आयएएस' अधिकारी झालेला नव्हता. आता तीही कसर भरून निघाली आहे. (Marathi Latest News)

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. यात बारामतीतील प्रतिक अनिल जराड याने उत्तुंग यश मिळवले आहे. त्यामुळे त्याचा 'आयएएस' अधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रतिकच्या रुपाने बारामती तालुक्याला आता पहिला 'आयएएस' अधिकारी मिळाला आहे. त्याबद्दल त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Pratik Jarad
UPSC Result 2023 : 'एमआयडीसी'त काम करण्याचा विचार करणारा सोहम बनणार 'आयएएस'

प्रतिक जराड हा बारामती (Baramati) तालुक्यातील उंडवडी क.प. येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील बारामती येथील आयएसएमटी कंपनीमध्ये क्लर्क आहेत. तर आई गृहिणी आहे. दहावीत त्याला ९७ तर बारावीमध्ये ९२ टक्के गुण प्राप्त झाले होते. त्याने माध्यमिक शिक्षण बारामतीतील म.ए.सो. विद्यालयातून पूर्ण केले. तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. (UPSC IAS Exam)

Pratik Jarad
UPSC Civil Services Exam Result 2022 : आर्थिक अडचणीवर मात करत नगरचा मंगेश बनला 'आयपीएस'

शालेय जीवनापासूनच प्रतिकने वरिष्ठ सनदी अधिकारी होण्याचे बाळगले होते. प्रतिकने २०१६ मध्ये पदवी घेतली. यानंतर त्याने 'यूपीएससी' परीक्षांची तयारी सुरू केली. त्यासाठी तो दिल्ली येथे गेला. त्याने काही वर्षे नियोजनबद्ध अभ्यास केला. आता पाचव्या प्रयत्नात प्रतिकने 'यूपीएसी' परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न साकारले. तो देशात ११२ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे 'आयएएस' (IAS) होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या निकालामुळे जराड कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com