खासदारकीच्या मानधनातून बापट यांनी ३८० रिक्षा चालकांना केली मदत

एक महिन्यापूर्वी राज्य सरकारने रिक्षा चालकंना प्रत्येकी दीड हजार रूपये मदतीची घोषणा केली होती
bapat.jpg
bapat.jpg

पुणे : खासदारकीच्या मानधनातील पाच लाख ७० हजार रूपयांची मदत ३८० रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रूपये या प्रमाणे वाटप करून पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी संकटाच्या काळात नवा पायंडा पाडला आहे. राज्य सरकारने जाहीर करूनही पुण्यातील रिक्षाचालकांना अद्याप अनुदान मिळाले नाही. या पाश्‍र्वभूमीवर खासदार बापट यांनी उचलेले मदतीचे पाऊल सकारात्मक आहे(.Bapat helped 380 rickshaw pullers from MP's honorarium)

राज्य सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ रिक्षाचालकांसोबत गुरुवारी (ता.२०) रोजी सकाळी पुण्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) आंदोलन करणार आहेत. सध्याच्या लॉकडॉऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.या काळात त्यांना अर्थिक मदतीची गरज आहे. म्हणून खासदार बापट यांनी ही मदत केली आहे.

एक महिन्यापूर्वी राज्य सरकारने रिक्षा चालकंना प्रत्येकी दीड हजार रूपये मदतीची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्याप रिक्षाचालकांच्या हाती काहीच पडले नाही. सरकारी मदतीसाठी रिक्षा संघटना पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अनुदान देण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय संगणक प्रणाली तयारी करीत आहेत. त्यानंतर त्याचे वाटप होईल, असे सांगण्यात येत आहे. खासदार बापट यांनीही या बाबत पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत रिक्षाचालक संघटनांची नुकतीच बैठक घेतली होती. परंतु, त्यातूनही अनुदान नेमके केव्हा मिळणार, हे निश्चित झाले नाही.
-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com