एका महिलेचा मतदारसंघ चोरून आमदार..! पुण्यात चंद्रकांतदादांविरोधात बॅनरबाजी

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
एका महिलेचा मतदारसंघ चोरून आमदार..! पुण्यात चंद्रकांतदादांविरोधात बॅनरबाजी
Banner in Pune against Chandrakant PatilSarkarnama

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा, असं पाटील म्हणाले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. (NCP Latest Marathi News)

ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी हे वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पाटील यांच्यावर टीका केली आहे. (Banner in Pune against Chandrakant Patil)

Banner in Pune against Chandrakant Patil
भाजपला धक्का; माजी आमदाराच्या नातवासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'एका महिलेचा मतदारसंघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? #चंपावाणी #जाहीर निषेध', असं या बॅनरवर म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रकात पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुणालाच आवडलं नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही आवडलं नसेल. शांत डोक्याने उत्तरं द्यावीत. आम्हीही खूप काही बोलू शकतो.

Banner in Pune against Chandrakant Patil
निवडणूक बिनविरोध नाही, सगळा खेळ अपक्षांवर! अजितदादांनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

प्रत्येकाला अधिकार आहे. दुसरा कोणी सांगू शकत नाही, घरी बसा. मी त्यांना म्हणतो, तुम्ही कोल्हापूरात जाऊन घरात बसा. असं म्हणून चालेल का? मीही त्यांना असं सांगू शकत नाही. त्यांनाही माझ्या बहिणीला सांगण्याचा अधिकार नाही. हा अधिकार मतदारांचा आहे. काही लोक कार्यकर्त्यांना चांगलं वाटावं म्हणून असं बोलत असतात, अशी टीका पवारांनी केली.

तुम्ही पाकिस्तानात जा, असं आम्ही म्हणणार नाही. त्यांनी कोल्हापूरात राहावं, पुण्यात राहावं. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर त्यांनी करावा. पण तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. कुठल्याही समाजाला, घटकाला, महिलांच्या भावना दुखावतील, असं बोलू नये. आमच्याही लोकांनी असं कुणी बोलू नये, असंही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in