Ashok Pawar News : दिग्गज अशोक पवारांना बांदल-मांढरे-पाचुंदकरांचा दे धक्का !

Shirur News : आगामी निवडणुकांवर परिणाम करणाऱ्या निकालामुळे राष्ट्रवादीवर चिंतनाची वेळ
Ashok Pawar, Mangaldas Bandal, Shekhar Pachundkar, Abaraje Mandhare
Ashok Pawar, Mangaldas Bandal, Shekhar Pachundkar, Abaraje MandhareSarkarnama

Jijamata Cooperative Bank Election : शिरूर तालुक्यातील जिजामाता सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाचा राजमाता पॅनलचा धुव्वा उडाला आहे. तर या बँकेवर राजमाता जिजाऊ पॅनलने एकहाती सत्ता मिळविली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार पवारांना पराभव सहन करावा लागला आहे.

आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांचे शिरूर तालुक्यावर २०१९ पासून एकछत्री अंमल आहे. जिजामाता बँकेच्या निवडणुकीत मात्र त्यांच्या विरोधात मंगलदास बांदल (Mangaldas Bandal), आबाराजे मांढरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांनी एकत्र येत मोट बांधली. त्यांच्या राजमाता जिजाऊ पॅनेलने आमदार पवार यांच्या नेतृत्वातील राजमाता पॅनेलचा पराभव केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांचे समर्थक शेखर पाचुंदकर यांनी या निवडणूकीचे व्यूहरचना केली होती. त्यानिमित्ताने शिरुर राष्ट्रवादीतील अंतर्गत खदखद पुढे आली.

Ashok Pawar, Mangaldas Bandal, Shekhar Pachundkar, Abaraje Mandhare
Ajit Pawar On Rumours: ...तोपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही; अजितदादांकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा

जिजामाता बँकेच्या एकूण १३ सभासदांसाठी २२ हजार मतदार मतदान करणार होते. निवडणुकीत मात्र केवळ ६ हजार ९६१ मतदान झाले. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात निवडणुकीचा धक्कादायक निकाल येत सत्ताधाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय बनला आहे.

दरम्यान २०१९ विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर आमदार अशोक पवार यांनी घोडगंगा साखर कारखाना (Ghodganga Sugar Factory) आणि जिल्हा बँकवर (PDCC) आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे या बँकेच्या निवडणुकीतही पवारांच्या राजमाता पॅनलला सहज विजय मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांचे कट्टर विरोधक मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे व शेखर पाचुंद्कर यांनी त्यांना धोबीपछाड दिली.

Ashok Pawar, Mangaldas Bandal, Shekhar Pachundkar, Abaraje Mandhare
Sanjay Raut On Ajit Pawar : आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार, यामध्ये अजित पवारसुद्धा येतात; राऊतांचं प्रत्युत्तर !

निवडणुकीचे वैशिष्ट्ये

गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदा राजकीय वैर विसरुन आमदार अशोक पवारांसोबत भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष काका खळदकर उतरले होते. खळदकारांच्या पत्नी संगीता खळदकर यांच्या विरोधात रेखा मंगलदास बांदल विजयी झाल्या. अशोक पवारांचे कट्टर समर्थक असणारे जाकीरखान पठाण या निवडणुकीत विरोधात गेले. त्यांनी अशोक पवारांचे कट्टर समर्थक सुनिता उत्तम दरेकर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे मांढरे यांचे ७७४, बांदल यांचे ५९१ तर जाकीरभाई पठाण यांचे २७२चे मताधिक्य आहे.

Ashok Pawar, Mangaldas Bandal, Shekhar Pachundkar, Abaraje Mandhare
Karnataka Election : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरीला ऊत : बोम्मई, येडियुराप्पा अन॒ खर्गे, शिवकुमार लागले कामाला

प्रकाश धारीवालांची चर्चा

शिरुरच्या राजकारणात शिरुर ग्रामिण आणि शिरुर शहर असे राजकीय घडामोडींची दोन केंद्रे आहेत. शिरुर शहरात माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल (Prakash Dhariwal) यांचे मोठे वजन आहे. त्यांना माननारे माजी संचालक जाकीरभाई पठाण यांना राजमाता पॅनलमधून विरोध झाला. त्यानंतर पठाण बांदल-मांढरे-पाचुंदकरांच्या पॅनलमध्ये गेले आणि विजयी झाले. आमदार पवारांच्या विरोधातील पॅनलला धारीवालांकडून प्रथमच उघडपणे मदत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिरुर शहारांतील आगामी नगरपालिका निवडणुकीवरही हा निकाल परिणाम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Ashok Pawar, Mangaldas Bandal, Shekhar Pachundkar, Abaraje Mandhare
Ajit Pawar On Rumours : आमदार बनसोडे, कोकाटेंची विधाने फुटीच्या चर्चेला खतपाणी घालणारी ठरली !

जिजामाता सहकारी बँकेतील विजयी सदस्य

सर्वसाधारण महिला गट : सुजाता जगताप (३४७९), प्रणिता पठारे (३५०६), मंगला भोजणे (३४१९), रत्नमाला म्हस्के (३४७८), पुजा वांजळे (३५४८), सुनिता शितोळे (३४६८), सुरेखा शितोळे (३५०६), सुरेखा शेलार (३५०५), रेखा बांदल (३६४०-३०४९). खुला गट : आबाराजे मांढरे (३७३९-२९६५). अनुसुचित जाती जमाती गट : अशोक काकडे (३५६२-२९१४). इतर मागास वर्ग गट : जाकीरखान पठाण (३४१६ -३१४४). विमुक्त जाती-भटक्या जमाती गट : मनिषा कालेवार (३४८०-३१५१).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com