'त्या' वादग्रस्त शिबिरावर बंदी घाला : हिंदू महासंघासह 'मनसे'चा इशारा!

Pune News : पुण्यातील कॅम्प परिसरात हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
Vanita Vagasker
Vanita VagaskerSarkarnama

पुणे : पुण्यात 'सेक्स तंत्र' नावानं एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात आल्याची जाहीरात करण्यात आली होती. यावरूनच कालपासून पुण्यात वादंग उठले आहे. येत्या १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबीर होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती तब्बल १५ हजार रुपये शुल्क आकारणात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याने, हा वादाचा मुद्दा ठरला होता. या जाहिरातीला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मात्र हा उपक्रम बेकायदेशीर आणि संशयास्पद असल्याचे मत अनेक संघटनांनी व्यक्त केले आहे.

"सेक्स तंत्र" प्रशिक्षण शिबीराच्या कार्यक्रमावर आता हिंदू महासंघ आक्रमक झाली आहे. "सेक्स तंत्र" नावाच्या अशा विकृत कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाने केली आहे. यासाठी हिंदू महासंघाने पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली आहे.

Vanita Vagasker
Pune University| मुंबईसह पुणे विद्यापीठाला मिळणार लवकरच नवे कुलगुरू

येत्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 'सेक्स तंत्र' या नावाने तीन दिवसांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा मजकूर या जाहिरातीत केला आहे. जाहिरातीनुसार 1, 2 आणि 3 ऑक्टोबर असे तीन दिवस पुण्यातील कॅम्प परिसरात हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे. मात्र हा कार्यक्रम झाल्यास कार्यक्रमस्थळी तीव्र आंदोलन करणार असल्याचे हिंदू महासंघाने जाहीर केले आहे. आयोजक व ठिकाणाची माहिती घेऊन कार्यक्रमास बंदी घालण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी, यासाठी आनंद दवे यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

या कार्यक्रमावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. "सेक्स तंत्र"च्या आयोजकांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करून, मनसे पदाधिकाऱ्यांना देखील पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. कार्यक्रमावर बंदी घातली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. मनसेच्या महिला आघाडीकडूनही पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in