सुरक्षेमुळे नाही, तर चेंगराचेंगरीच्या भीतीने पालखी सोहळ्यात ड्रोन उडवण्यावर बंदी

आषाढी वारीसाठी येत्या २० व २१ तारखेला पालखी निघणार आहे
सुरक्षेमुळे नाही, तर चेंगराचेंगरीच्या भीतीने पालखी सोहळ्यात ड्रोन उडवण्यावर बंदी
Sant Tukaram Maharaj, Sant Dnyaneshwar Maharajsarkarnama

पिंपरी : देहू आणि आळंदी येथून आषाढी वारीसाठी येत्या २० व २१ तारखेला संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar Maharaj) आणि तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालख्या पंढरपूरसाठी प्रस्थान करणार आहेत. त्यासाठी या दोन्ही ठिकाणी तसेच दोन्ही पालखी मार्गावर मोठ्या संख्येने भाविक जमतात. त्यातील ग्रामीण भागातील वारकऱ्यांना ड्रोन माहिती नसल्याने अचानक ते हवेत समोर आले, तर त्यामुळे मोठी गडबड गोंधळ होऊन चेंगराचेंगरी होण्याची भीती पोलिसांना (Police) वाटते आहे. म्हणून या दोन्ही श्री क्षेत्री मंदिर परिसरात तसेच दोन्ही पालखी मार्गावरही ड्रोन उडविण्यावर व त्याव्दारे चित्रीकरण करण्यावर पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी बंदी घातली आहे.

तुकोबारायांची पालखी २१ ला, तर ज्ञानोबारायांची २२ तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहे. तुकोबारायांच्या पालखीचा एक दिवस मुक्काम शहरातील आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात आहे. तर, ज्ञानोबारायांची पालखी विनामुक्कामी पुण्याकडे २२ तारखेला आगमनाच्या दिवशीच प्रस्थान ठेवणार आहे. म्हणजे जेमतेम अर्धा ते दीड दिवस दोन्ही पालख्या शहरात असणार आहे. मात्र, ड्रोनबंदी आळंदी व देहूतील मंदिर परिसर व पालखी मार्गासह लगतच्या परिसरातही १७ तारखेपासूनच लागू करण्यात आली आहे. ती दोन्ही पालख्या पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईपर्यंत २२ तारखेपर्यंत कायम राहणार आहे. त्यासाठी सुरक्षेचे कारण पोलिसांनी पुढे केलेले नाही. तर, ड्रोन हे ग्रामीण भागातील वारकरी तथा भाविकांना ज्ञात नाही.

Sant Tukaram Maharaj, Sant Dnyaneshwar Maharaj
‘आप्पा, तुम्ही मला शिव्या घातल्या...’ दरेकरांच्या वक्तव्यावर ठाकूर म्हणाले, ‘प्रसादला नक्कीच...’

त्यामुळे ते अचानक समोर आले, तर गोंधळ होऊन चेंगराचेंगरी होईल, अशी भीती पोलिसांना वाटते आहे. त्याजोडीने पालखी मार्गावर फळे, फुले व खेळणी विकणाऱ्या पथारी व्यावसायिक तथा फेरीवाल्यांमुळे पालखी मार्ग जाणारा रस्ता अरुंद होऊन पालखी प्रस्थान वेळी चेंगराचेंगरी होईल, अशी शक्यताही पोलिसांना वाटते आहे. म्हणून त्यांच्यावरही १७ ते २२ जूनपर्यंत पोलिसांनी निर्बंध टाकले आहेत. त्याचे उल्लंघन केले, तर फौजदारी करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, फेरीवाल्यांवरील सात दिवसांच्या बंदीला टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे तसेच कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज विरोध दर्शवला. सात दिवसांची बंदी अजिबात योग्य नसल्याचे सांगत फूल, फळे व खेळणी विक्रेते हा पालखी सोहळ्याचाच एक भाग आहे, असे कांबळे म्हणाले. त्यात दोन वर्षांनी हा सोहळा होत असल्याने तो मुक्तपणे व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर, दोन दिवसांची बंदी समजू शकतो. मात्र, हातावर पोट असणाऱ्या व दररोजच्या कमाईवर चूल पेटणाऱ्या फेरीवाल्यांवर सात दिवसांची बंदी व्यवहार्य नसल्याचे नखाते यांनीही सांगितले.

Sant Tukaram Maharaj, Sant Dnyaneshwar Maharaj
विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

पालखी काळात फेरीवाले स्व:ताहून दोन दिवस बंद पाळून या सोहळ्यात सहभागी होतात. आपल्या परीने वाटप करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सात दिवस रोजीरोटी मिळाली नाही, तर मात्र त्यांचा उद्रेक होईल. अन् त्याला पोलिस जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला. अतिरिक्त पाच दिवसांचा मेहनतताना त्यांना पोलिस व पिंपरी पालिका देणार आहे का अशी विचारणा त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in