Sharad Pawar : पवारांच्या मध्यस्थीमुळे दोन संघटनांमधील 'कुस्ती' बरोबरीत सुटली..; लांडगे आखाड्याबाहेर !

Sharad Pawar : महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणीच रद्द केली होती.त्यानंतर या वाद न्यायालयात गेला होता.
Sharad Pawar latest news
Sharad Pawar latest news sarkarnama

Sharad Pawar : कुस्तीगीर संघटनाच्या वादात महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोण घेणार, असा वाद रंगला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांनी तोडगा काढला आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ता. 11 ते 15 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे.

राज्यात सत्ताबदल होताच राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व असलेली शरद पवार अध्यक्ष राहिलेल्या कुस्तीगीर परिषदेची कार्यकाकणी बरखास्त करण्यात आली होती. भारतीय कुस्तीगीर संघानं घ्यायला लावलेल्या स्पर्धांचं आयोजनच होत नसल्याचा ठपका ठेवत भारतीय कुस्तीगीर संघानं ही करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणीच रद्द केली होती.त्यानंतर या वाद न्यायालयात गेला होता.

Sharad Pawar latest news
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल 'या' वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत ; महिलेनं त्याचं भाषण थांबवलं..

बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवण्याचा पवित्रा घेतल्यानं वाद निर्माण झाला होता. परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या बरखास्तीला न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई हायकोर्टाकडून कुस्तीगीर परिषदेचा आदेश रद्दबातल करण्यात आला होता.

Sharad Pawar latest news
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला गालबोट ; युवकाने स्वत:ला पेटवून घेतलं..

जुन्या-नव्या कुस्तीगीर परिषदेच्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार आणि बृजभुषण सिंग यांच्यातील चांगल्या संबधातून हा तोडगा काढण्यात आला आहे. बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. ज्यानंतर आता रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी कुस्तीगीर परिषदेचे कामकाज पाहणार आहे. तसंच शरद पवार हे सल्लागार म्हणून या कुस्तीगीर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com