Kasba By Election : राहुल गांधीचा फोन आला म्हणूनच मी अर्ज मागे घेतला; बाळासाहेब दाभेकरांचा दावा

Pune Politics News : ''पक्षामधील अंतर्गत गटबाजीमुळे बंड पुकारलं होतं. मात्र...''
Rahul Gandhi and Balasaheb Dabhekar
Rahul Gandhi and Balasaheb DabhekarSarkarnama

Kasba-Chinchwad By-Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून राजकारण तापले आहे. तर कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसने (Congress) उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करत बाळासाहेब दाभेकरांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष भरला होता. मात्र, त्यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली.

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडून दाभेकर यांची मनधरणी करण्यात आली. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा दाभेकर यांना फोन आल्यानंतर आपण उमेदवारी मागे घेतली असल्याचा दावा दाभेकरांनी केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दाभेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

Rahul Gandhi and Balasaheb Dabhekar
Congress : नाना पटोलेंचा ‘तो’ निर्णय कॉंग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसारच, अतुल लोंढेंचे स्पष्टीकरण...

यावेळी दाभेकर म्हणाले, ''गेल्या 40 वर्षापासून मी पक्षासाठी काम करत आहे. पण जेव्हा आम्ही पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली तेव्हा मला उमेदवारी देण्यात आली नाही. मी पक्षामधील अंतर्गत गटबाजीमुळे बंड पुकारलं होतं. मात्र, राहुल गांधींचा फोन येतो ही गर्वाची बाब आहे. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे'', असं दाभेकरांनी सांगितलं.

Rahul Gandhi and Balasaheb Dabhekar
BJP news; शिंदे सरकारच्या यश-अपयशावर भाजप नेत्यांचे होणार मंथन?

दरम्यान, कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मैदानात उतरले आहे. तसेच काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत रंगत वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com