Bala Bhegde News: देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू बाळा भेगडेंवर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी!

Pune Politics | २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या लोकसभा प्रवास योजनेच्या प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे.
Big responsibility from BJP to Bala Bhegade
Big responsibility from BJP to Bala BhegadeSarkarnama

Big responsibility from BJP to Bala Bhegade : महाराष्ट्र भाजपकडून संघटन विस्तार व बळकटीसाठी विभाग प्रभारी,जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या काल (२५ मे) झाल्या. त्यात सोलापूर प्रभारीची जबाबदारी मावळचे (जि.पुणे) माजी आमदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना देण्यात आली आहे. (Bala Bhegde, a Devendra Fadnavis confidant, has given a big responsibility by the BJP)

Big responsibility from BJP to Bala Bhegade
Mumbai Loksabha Election: लोकसभेच्या जागांसाठी भाजप-शिंदे गटात वाटाघाटी; श्रीकांत शिंदे सोडणार हक्काचा मतदारसंघ?

प्रदेश सरचिटणीसांना विभाग, तर उपाध्यक्ष आणि चिटणीसांना भाजपने जिल्हा प्रभारी नेमले आहे. त्यानुसार सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर या पक्षाच्या तीन जिल्ह्याची जबाबदारी भेगडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाचे ते जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे ते विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात.

यापूर्वी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या लोकसभा प्रवास योजनेच्या प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सोपविलेली आहे. पंढरपूर पोटनिव़डणुकीतही ते प्रभारी होते. तेथे पक्षाला विजय मिळाला. गोवा विधानसभा निवडणुकीत, तर तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली गेली होती. ती सुद्धा त्यांनी यशस्वी पार पाडली. म्हणून आता पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची पक्षाने त्यांना सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी केले गेले आहे.

Big responsibility from BJP to Bala Bhegade
Sengol : राजदंड सोपवणाऱ्या पुजाऱ्याचे मोदींविषयी मोठं विधान ; म्हणाले, ते पुन्हा पंतप्रधान..

दरम्यान, सोलापूरचे प्रभारी करून पक्षाने मोठी संधी देत विश्वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया या नियुक्तीवर बाळा भेगडे (Bala Bhegde) यांनी आज `सरकारनामा`ला दिली. पक्ष संघटन अधिक मजबूत करीत पक्षाला पुन्हा विजय मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर दक्षिण (सुभाष देशमुख) आणि सोलापूर उत्तर (विजय देशमुख) मध्ये भाजप आमदार असून सोलापूरचे खासदारही भाजपचेच जय सिद्धेश्वर शिवाचार्य आहेत. अपवाद सोलापूर मध्यचा आहे.तेथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सोलापूरात शत-प्रतिशत भाजप करणार का असा प्रश्न केला असता भेगडे म्हणाले की, ``ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकणे हा भाजपचा अजेंडा आहे``.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com