Himanta Biswa Sarma : बच्चू कडू अडचणीत ; माफी मागा, मुख्यमंत्र्यांनी खडसावले..

Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी पुढे आली..
Bachchu Kadu Latest News in Marathi
Bachchu Kadu Latest News in Marathisarkarnama

Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष, अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी काही दिवसापूर्वी विधानसभेत आसामबाबत केलेल्या विधानामुळे आसाममध्ये नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद आसामच्या विधानसभेत उमटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री आसामचे हिमंता बिस्वा सर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना आसाममध्ये लोक कुत्रे खातात असं विधान केलं. यानंतर आसाममधील विधानसभेत जोरदार गदारोळ झाला आहे. बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी पुढे आली.

Bachchu Kadu Latest News in Marathi
MNS : राज ठाकरेंचा आधी इशारा, नंतर मुख्यमंत्र्यांचे मानले आभार : काय आहे नेमकं प्रकरण ?

“आसामबद्दल इतकं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आसाममधील विरोधी पक्षातील आमदारांनी हे वक्तव्य करणाऱ्या बच्चू कडूंना अटक करा, अशी मागणी केली.

'बच्चू कडूंनी आसामच्या विधानसभेत येऊन जाहीर माफी मागावी' अशी मागणी आसामच्या काही आमदारांनी केली आहे. त्यामुळे या वादाची आता चांगलीच चर्चा होत आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे.

Bachchu Kadu Latest News in Marathi
Pune News : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल ; भाजप कार्यकर्त्यांला मारहाण करण पडलं महागात...

"बच्चू कडू यांनी आसामच्या जनतेबाबत केलेल्या विधानामुळे अतिव दुःख झाल्याचे सांगत आसामच्या संस्कृतीबद्दल आपले अज्ञान दाखवले आहे. त्यामुळे तुम्ही आसामच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवाल, अशी आशा आहे, अशा शब्दात सर्मा यांनी आपल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.

या वादानंतर बच्चू कडू यांनी यापूर्वी माफी मागितली आहे. कडू म्हणाले, “नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपासच आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतलं गेलं, तिथं नागालँड म्हणायला हवं होतं. एवढीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com