पुरंदरेंनी छत्रपतींवर अन्याय केला, त्यांचे लिखाण मला कधीच पटले नाही : पवारांचा हल्लाबोल

"सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नको,"
babasaheb purandare, sharad pawar
babasaheb purandare, sharad pawarsarkarnama

पुणे : श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज पुण्यात झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांच्यावर टीका केली. (sharad pawar latest news)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास स्वामी यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा यांचा संबध, याविषयी शरद पवारांनी भाष्य केलं. पुरंदरे यांनी सत्यांच्या आधारे मांडणी केली नाही,असा आरोप पवारांनी यावेळी केला.

"मला बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण कधीच पटले नाही, पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला," असे पवार म्हणाले. "सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नको,"

babasaheb purandare, sharad pawar
ठाकरेंनी राजीनामा दिला, तेव्हा शिंदेंच्या डोळ्यात पाणी आले होते, आता ते गद्दार ठरले ?

कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज, श्रध्दा कुंभोजकर,चंद्रशेखर शिखरे, राजकुमार घागरे, जयसिंगराव पवार, डॉ.पी.डी. जगताप, श्रीमंत कोकाटे, राहूल पोकळे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले..

  • शिवाजी महाराजांवरील लिखाणात आतापर्यंत काहीजणांनी सत्य तर काहींनी असत्य लिखाण केले. परंतु कोकाटे यांनी एकत्रितरित्या सत्य गोष्टींचे लिखाण केले.

  • देशात अनेक राजे होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जनतेचे राज्य हाेते. राज्य चालविण्याचा वेगळा दृष्टीकोन राजेंनी मांडला.

  • इतिहासातील अनेक सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यामुळे मी खाेलात जात नाही. गोविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिले त्यातून छत्रपतींच्या काळातील वास्तव समोर आले. ते विसरता येणार नाही.

  • शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास स्वामी,दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? अशा अनेकजणांचे संबंध जाणीवपूर्वक जोडले गेले. दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com