Maval News : अपक्ष लोकसभा लढलेल्या बाबाराजेला फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक

Pimpri-Chinchwad Crime News : त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मावळ न्यायालयाने आज दिला.
Babaraj Deshmukh News
Babaraj Deshmukh NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : गत २०१९ च्या मावळ लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि सोशल मिडियात (Social media) सक्रिय असलेला प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय 33, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांनी आज अटक केली. त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मावळ न्यायालयाने आज (ता.१८) दिला.

बाबाराजेची पाच एकर जमीन बेबडओहळ येथे वनीकरणात आहे. त्यातील २५ गुंठे जमीन त्याने रविंद्र शिवाजीराव देशमुख (वय ४८, रा. वडगाव बुद्रूक, ता. हवेली, जि. पुणे) या सिव्हील इंजिनिअरला २५ लाख रुपयांना दिली होती. मात्र, वनजमिनीचे प्लॉटिंग होत नाही. त्यामुळे तिचे खरेदीखत होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे देशमुखांची फसवणूक झाली होती.

Babaraj Deshmukh News
BJP State Executive Meeting: निवडणुकांच्या तोंडावर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची होणार चांदी; पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

पैसे देऊनही खरेदीखत होत नसल्याने त्यांनी त्यासाठी तगादा लावला. त्यावर त्याकरिता आणखी ७० लाख रुपये बाबाराजेने मागितले. ते न दिल्यास वा पोलिसात गेल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती. २०१३ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ही घटना घडलेली आहे.

Babaraj Deshmukh News
Pune News: स्टॉलला लाथ मारणाऱ्या जगतापांवर कारवाई कधी ?; राजकीय पक्ष,पथारी संघटना आक्रमक

दरम्यान, काल यासंदर्भात गुन्हा दाखल होताच बाबाराजेला शिरगाव पोलिसांनी (Police) लगेच अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. खंडणी व फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यात एकाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याबद्दल आश्चर्य वर्तविले जात आहे. पीएसआय कांबळे पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com