EDचा अविनाश भोसलेंना दणका : 'पुण्यातील मालमत्ता रिकामी करा'

अविनाश भोसले सध्या आठ जून पर्यंत सीबीआय कोठडीत आहे.
Avinash Bhosale News in Marathi, Pune News, ED News
Avinash Bhosale News in Marathi, Pune News, ED Newssarkarnama

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना नुकतीच सीबीआयने (CBI) अटक केली. येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. (Avinash Bhosale latest news)

सीबीआयच्या अटकेनंतर आता ईडीनेही (ed) कारवाईची नोटीस बजावली आहे. या नोटिशीत ईडीनं भोसले यांना त्यांच्या पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यास सांगितलं आहे. मंत्री विश्वजित कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.

सीबीआयने गेल्या शनिवारी अविनाश भोसले, शाहीद बलवा आणि विनोद गोएंका यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर कारवाई केली होती. त्यानंतर अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली. सध्या ते आठ जून पर्यंत सीबीआय कोठडीत आहे.

Avinash Bhosale News in Marathi, Pune News, ED News
सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही !

येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांनी दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये 3700 कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून गुंतवले. ज्यामध्ये डीएचएफएलकडून राणा कपूर यांना 600 कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचे समोर आले होते.

त्यानंतर डीएचएफएलनेही 3700 कोटी रुपये छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच बलवा आणि गोएंका यांच्या कंपनीत वळती केली. यामुळेच छाब्रिया यांना या प्रकरणी अटक होताच सीबीआयने तात्काळ भोसले, बलवा व गोएंका या तिघांशी संबंधित ठिकाणी छापा टाकला. गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती.

Avinash Bhosale News in Marathi, Pune News, ED News
'झुकेंगे नहीं': काँग्रेसचा 'पुष्पा'अंदाज, सोनिया, राहुल यांना EDच्या नोटीशीनंतर मोदींवर टीका

मंत्री विश्वजित कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत. ते पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत. अविनाश भोसले व्यावसायिक असले तरी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे पुण्यातील बाणेर इथला त्यांचा अलिशान व्हाईट हाऊस बंगला आणि तीन हेलीकॉप्टर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पांढऱ्या रंगाच्या या बंगल्याचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखा आहे. इथंच भोसले यांची तिन्ही हेलिकॉप्टर्स असतात. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी प्रचारासाठी अविनाश भोसले यांच्या हेलिकॉप्टरचा वापर करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com