प्रवीण चव्हाण पोलिसांकडे जाताच तेजस मोरेंचेही आक्रमक उत्तर; ऑडिओ क्लिप केली व्हायरल

तेजस मोरे (Tejas More) हे त्याच्या स्वत:च्या जामीन प्रकरणावरुन वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या संपर्कात आले होते. त्यातून त्यांची जवळीक वाढल्याचा दावा मोरेंनी केला आहे.
Adv. Pravin Chavan & Tejas More
Adv. Pravin Chavan & Tejas MoreSarkarnama

पुणे : भाजप (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी भोईटे गटावर 9 जानेवारीला पडलेल्या धाडी संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) व तेजस मोरे (Tejas More) या दोघांमधील फोनवर झालेले संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे. या क्लिपमध्ये करण्यात आलेल्या धाडीबाबत संभाषण करण्यात आले आहे. या संभाषणानूसार, संबंधित केसबाबत कोणते कागदपत्रे कुणाकडे आहेत, ते कुठे राहतात, फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याबाबत संभाषण आहे.

Adv. Pravin Chavan & Tejas More
आता बोगस सोमय्यांचाही राष्ट्रवादीला त्रास; मागवली आरटीआयखाली माहिती...

ऑडिओ क्लिपमधील संभाषण ...

पहिली व्यक्ती (चव्हाण) - त्यांना रेड टाकायची असेल पोलिसांना तर त्यांना योग्य ठिकाणी टाकता येईल ना.

दुसरी व्यक्ती (मोरे) - कोणत्या ठिकाणी सर?

पहिली व्यक्ती - यांचे जे डॉक्युमेंट असतील तर

दुसरी व्यक्ती - हा

पहिली व्यक्ती - ते कुठे ठेवलेले आहेत?..

दुसरी व्यक्ती - बरं

पहिली व्यक्ती - आता जर उद्या गेले पोलीस तर कुठे रेड टाकायची? तर अॅड्रेस काय आहे?.. वीरेंद्र भोसले आता वीरेंद्र तर नाहीच आहे, काय नाव त्याचं?

दुसरी व्यक्ती - शिवाजी भोईटेचं हाऊस सर्च करू शकतो ना सर...

पहिली व्यक्ती - त्याच्या घरात नाही ठेवणार, निलेश भोईटे आणि त्याचा पुण्याचा अॅड्रेस काय आहे बघा ...

दुसरी व्यक्ती - बरं ... कारण आम्ही एकदा जाऊन आलो होतो

पहिली व्यक्ती - नाही, नलवाणीला माहिती आहे.. त्यांना विचारा

दुसरी व्यक्ती - हो

पहिली व्यक्ती - जळगावचा आणि रेकॉर्ड कुठे आहेत ते जयंत भोईटेला विचारा

दुसरी व्यक्ती - बरं, बरं

पहिली व्यक्ती - मग विचारून बघा

दुसरी व्यक्ती - बरं विचारतो आणि सांगतो...आणि मग कॅश पण सापडेल त्यांच्याकडे

पहिली व्यक्ती - कुणाकडे?

दुसरी व्यक्ती - निलेश भोईटेकडे

पहिली व्यक्ती - हो पण त्याचा अॅड्रेस घ्यायला सांगा आधी आणि केव्हापासून सांगतोय.

दुसरी व्यक्ती - अॅड्रेस सर...आम्ही जाऊन आलो होतो एकदा.. वारघेला राहतो तो.. आदित्य गार्डन सोसायटीत

पहिली व्यक्ती - तो राहतो का त्याची फॅमिली?

दुसरी व्यक्ती - पण ती सोसायटी खूप मोठी आहे... सर जवळपास 20-25 बिल्डिंग आहेत..

पहिली व्यक्ती - तो तिथे नाही राहत?

दुसरी व्यक्ती - हो.. त्याच्या बहिणीच्या सासऱ्याकडे राहतो

पहिली व्यक्ती - हा विचारून पाहा वाटल्यास

दुसरी व्यक्ती - हो चालेल चालेल

प्रकरण काय आहे ?

भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्टिंग ऑपरेशनसंदर्भातील एक पेन ड्राईव्ह विधावसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. भाजप नेत्यांना कशाप्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. याबाबतचा पुरावा फडणवीसांनी पेन ड्राईव्ह दिला होता. हे स्टिंग ऑपरेशन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील असल्याचा दावा फडणवीसांनी करत चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर चव्हाणांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते. तर, हे कथित स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे या तरुणाने केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. तेजस मोरेंनी चव्हाण यांच्या कार्यालयात एक घड्याळ लावले होते. त्यात कॅमेरा बसवत त्यानंतर आवाज बदलवून हे कथित स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर आता मोरेंनी खुलासा केला आणि आपला या प्रकरणात वापर केल्याचा दावा केला होता.

Adv. Pravin Chavan & Tejas More
अनिल परब तर अडकलेच सोबत सदानंद कदमही सापडले...

तेजस मोरेंचा खुलासा..

प्रवीण चव्हाण यांच्या खोटारडेपणा संदर्भात आपण लवकरच मोठा भांडाफोड करणार आहे. चव्हाण यांच्याच सांगण्यावरुन पोलिस महाजन यांच्यावर कारवाई करत होते. त्यातूनच पुणे पोलिसांकडून जळगावात महाजनांविरोधात रेड टाकण्यात आली. त्यावेळी पोलिसांची औरंगाबाद पासूनच्या जेवणाची आणि राहण्याची सगळी व्यवस्था माझ्याकडे होती. महाजन आणि रवींद्र बराटे यांच्या फाईलसुद्धा प्रवीण चव्हाण यांनीच ड्राफ्ट करुन ठेवले होते. प्रवीण चव्हाण हे सगळे खडसे साहेबांच्या सांगण्यावरुन करत होते. महाजन यांचे ड्रग्स पेडलर्सशी संबंध आहेत, असे दाखवून त्यांच्यावर मोका लावायचा होता. त्यांनी मला तसे सांगितले होते. माझ्याकडे त्यांचे सर्व व्हाट्सअॅप चॅट आहेत, असा खुलासाही मोरेने केला आहे.

"प्रवीण चव्हाण सगळे चुकीचे करत होते. सुरुवातीला ते माझ्याकडून लिहून घेत होते. तेव्हा मला कायद्याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी त्यांची मदत करत होतो. पण काही वकील मित्रांशी बोलल्यावर ते कशा पद्धतीने चुकीचे काम करत आहेत हे मला कळाले आणि मग मी हळूहळू त्यांच्याशी संबंध कमी केले. त्यांची फी चार लाख रुपये ठरलेली होती. मी त्यापैकी 3 लाख 85 हजार रुपये यापूर्वीच दिले आहेत. केवळ 15 हजार रुपये उरले असून ते मी कधीही द्यायला तयार आहे, असे मोरेने सांगितले होते.

मोरे आणि चव्हाणांचा काय आहे संबंध?

तेजस मोरे हे त्याच्या स्वत:च्या जामीन प्रकरणावरुन वकील प्रवीण चव्हाण यांच्या संपर्कात आले होते. त्यातून त्यांची जवळीक वाढली. मोरेंची इंग्रजी चांगली असल्याने चव्हाणांनी त्याच्याकडून अनेक प्रकरणाचे ड्राफ्टिंग करुन घेत होते. त्याच प्रकरणांपैकी महाजनांचे ड्रग्ज पेडलर्सशी संबंध असल्याचे प्रकणाची ड्राफ्टिंग करुन घेतले, असा दावा मोरेंनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in