पंतप्रधान मोदींच्या सभेला १० हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती

देशाचे पंतप्रधान देहू नगरीत येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळेत देहू येथील सभास्थानी पोचत असून या सभेला दहा हजाराहून वारकरी तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.देहूत श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे. देशाचे पंतप्रधान देहू नगरीत येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने वारकरी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांशिवाय स्थानिक नागरीक मोठ्या संख्यने सभास्थानी उपस्थित आहेत.

Narendra Modi
तुम्ही वडाला फेऱ्या मारत नाही, पण व्रत करणाऱ्या महिलांच्या भावना का दुखावता ?

सभास्थानी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सभेच्या ठिकाणी पोचणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच सोडण्यात येत आहे. ज्यांनी काळे कपडे परिधान केले आहेत, काळा मास्क किंवा कोणत्याही स्वरूपातील काळे कापड घातलेल्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. पाण्याची बाटली तसेच इतर कोणत्याही वस्तू घेऊन प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

Narendra Modi
पंतप्रधान मोदींसाठी पुण्यात तयार झाली विशेष तुकाराम पगडी आणि उपरणी !

या सोहळ्यासाठी काही वेळातच पंतप्रधानांचे आगमन होत आहे. दरम्यान,सभास्थळी भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायक कल्याण गायकवाड, कार्तिकी गायकवाड , कौस्तुभ गायकवाड तुकोबारायांच्या विविध रचना सादर करीत आहेत. राज्यातून तसेच राज्याबाहेरील काही भाविकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली आहे. सभास्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त असून तपासणी करूनच आत सोडले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com