उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला : आदित्य यांच्या सभेनंतर पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Uday Samant हे आज दिवसभर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
Attack on Uday Samant Vehicle in Pune
Attack on Uday Samant Vehicle in PuneSarkarnama

पुणे : Attack on Uday Samant Vehicle in Pune मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या ताफ्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले असता कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची काच फुटली. यावरून शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी तुमच्याही गाड्या फुटतील, असा इशारा शिवसैनिकांना दिला आहे.

आज शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा ही पुण्यातील कात्रज भागात सुरू होती. दरम्यान ही घटना घडली आहे. यावेळी सामंत हे येथूनच जात असल्याने शिनवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेक केली आणि गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्याची माहिती मिळत आहे.

Attack on Uday Samant Vehicle in Pune
Dombivali : शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक भिडले, ठाकरेंशेजारी शिंदेंचा फोटो लागलाच!

नेमक काय घडलं?

पुण्यातील कात्रज भागात उदय सामंत हे मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवली त्यांची गाडी अडवत गाड्यांवर फटके मारत चपला आणि बाटल्या देखील फेकले. आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी या वेळी होती. त्याच वेळी मुख्यमत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकत असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com