दहशतवादाचं पुणे कनेक्शन: टेरर फंडिंग प्रकरणी एकाला अटक

Pune |Terror Funding news | पुण्यातून यापूर्वीही "टेरर फंडिंग" प्रकरणी एकाला अटक झाली होती.
Pune Terror Funding news, Pune News in Marathi, Pune Latest Updates
Pune Terror Funding news, Pune News in Marathi, Pune Latest Updates

Pune Terrorist activity latest news

पुणे : अतिरेकी संघटनाना अर्थपुरवठा (Terror funding) करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) दापोडीतूव एका तरुणाला अटक केली. जुनेद मोहम्मद (वय २८) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. जुनेद जम्मू काश्मीरमधील गजवाते अल हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या संघटनेकडून त्याला पैसे पुरवण्यात आल्याचा आरोप आहे. (Pune Latest Updates)

मिळालेल्या माहितीनुसार, जुनेद मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचा रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झालेलं आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या बॅंक खात्यावर खात्यात पैसे जमा झाले होते. याच दरम्यान, जम्मू कश्मीरमधील "गझवाते अल हिंद" या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. अशी माहिती एटीसला मिळाली. त्यानुसार, सोमवारी दुपारपासून त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर तो चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

Pune Terror Funding news, Pune News in Marathi, Pune Latest Updates
पुणे पालिकेत 87 जागा महिलांसाठी ; अनेकांचे राजकीय भवितव्य घडणार किंवा बिघडणार

गजवाते अल हिंद या दशतवादी संघटनेसह जुनेद मोहम्मद हा "लष्कर ए तैयाबा" या संघटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आज (२४ मे) दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, पुणे स्टेशन येथे मागच्या आठवड्यात स्फोटके आढळली होती. त्यानंतर रेल्वे, पुणे पोलिस, एटीएस सह सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे, त्यातच एटीएसने दापोडी येथे केलेल्या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचा या प्रकरणाशी संबंध होता का ? तसेच त्यास पुण्यात काही घातपाती कृत्य करायचे होते का ? याचा तपास एटीएस करत आहे.

पुण्यातून यापूर्वीही "टेरर फंडिंग" प्रकरणी एकाला अटक झाली होती. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून येणारा पैसा (टेरर फंडिंग) भारताच्या वेगवेगळ्या भागात पोचविणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीप्रमुख रमेश शहा (वय 28, रा.गोपालगंज, बिहार) यास महाराष्ट्र व उत्तर प्रदेश "एटीएस'ने फेब्रुवारी २०१९ मध्ये पुण्यातून अटक केली होती. पोलिसांच्या भीतीने त्याने उत्तर प्रदेशमधून पलायन करून पुण्यात वास्तव्य केले होते. तो नेटकॉलींगद्वारे दहशतवाद्यांच्या हॅंडलरशी संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळणारे पैसे तो देशातील विविध राज्यात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी पोचवीत होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com