Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023 : पहिल्या चार तासात चिंचवडमध्ये 10.45 टक्के तर कसब्यामध्ये...

Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला.
Kasba-Chinchwad by - Election
Kasba-Chinchwad by - ElectionSarkarnama

Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023 : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे.

चिंचवड येथून विठ्ठल काटे (NCP), भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत. 2 मार्च रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

Kasba-Chinchwad by - Election
Chinchwad Bypoll Election : चिंचवडमध्ये मतदानास गालबोट ; दोन गट भिडले

चिंचवड मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 10.45% तर कसब्यामध्ये 8.25 टक्के मतदान झाले आहे. कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला. यावरुन गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेणार का? असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. दोन गटात धक्काबुक्की झाली. पिंपळे-गुरव येथील मतदान केंद्र ३४८ येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला आहे. येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.

पिंपळे गुरव येथील मतदान केंद्र ३४८ माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव येथून शंभर मीटरच्या अंतरावर भाजपाचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर व गणेश जगताप यांच्यात 'तु माझ्याकडे का बघतोस,' म्हणून असे म्हणत धक्काबुक्की व बाचाबाची झाली. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com