Eknath Shinde News : अॅड. असिम सरोदेंच्या दाव्याने खळबळ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार?

Will Eknath Shinde Resign Before Supreme Court Hearing?: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात अॅड. असिम सरोदे म्हणाले.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

प्राची कुलकर्णी

Asim Sarode News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली आहे. न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये न्यायालयाचा निकाल येवू शकतो. या निकालासंदर्भात ॲड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी अनेक शक्यता वर्तवल्या आहेत.

सत्तासंघर्षाचा निकाल ११ ते १२ मे रोजी लागण्याची शक्यता अॅड. असिम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निकाल लागण्याच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देवू शकतात, असे मोठे विधान सरोदे यांनी केले आहे. "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र झाले तर उरलेले आमदार आपोआप अपात्र होतात. त्यामुळे सरकार कोसळेल. त्यांच्याकडे संख्याबळ राहणार नाही. न्यायालयाचा निकालाचा अंदाज त्यांना आला तर मुख्यमंत्री शिंदे आधीच राजीनामा देऊ शकतात, असेही सरोदे म्हणाले.

Eknath Shinde News
Rahul Narvekar News : सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांचा लंडन दौरा; राजकीय वर्तुळात काय घडतेय?

आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे हा सोपा निर्णय म्हणून न्यायालय अवलंबू शकते," तर दुसरी शक्यता म्हणजे "बहुमत चाचणी करण्यासंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेश रद्द ठरवला जाऊ शकतो. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला, असल्याचे सरोदे म्हणाले.

"पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून थेट सर्वोच्च न्यायालयच (Supreme Court) १६ आमदारांना अपात्र ठरवू शकते. यासाठी घटनेतील कलम १४२ चा आधार न्यायालय घेऊ शकते, अशी तिसरी शक्यता आहे. तसेच एक धूसर व अस्पष्ट शक्यता आहे की हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे १० व्या परिशिष्टासंदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते, अशा शक्यता असिम सरोदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Eknath Shinde News
Asim Sarode News: मुख्यमंत्री शिंदेंसह 16 जण अपात्र ठरले तर उर्वरित आमदारही...; सरोदेंनी वर्तवल्या 'या' चार शक्यता !

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाआधीच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र, अॅड. असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार असल्याची शक्याता आहे.

(Political Web Stories)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com