बुचकेताई, तुमचं राष्ट्रवादीकडं लक्षच नसतं : अजितदादांचा टोमणा
Asha Buchke-Ajit PawarSarkarnama

बुचकेताई, तुमचं राष्ट्रवादीकडं लक्षच नसतं : अजितदादांचा टोमणा

तेवढ्यात कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या बुचके यांनी ‘कांतीलाल उमापही आले आहेत,’ असे सांगितले.

पुणे : आशाताई बुचके (Asha Buchake), पहिलं तुमचं लक्ष शिवसेनेकडे (shivsena) असायचं, आता भारतीय जनता पक्षाकडं (bjp) असतं. पण, राष्ट्रवादी काँग्रेसकडे (ncp) तुमचं लक्षचं नसतं, त्यामुळे माझी पंचाईत होते,’ असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना मारला. (Ashatai Buchake, you don't pay any attention to NCP : Ajit Pawar)

पुणे जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी समारंभाचे आयोजन रविवारी (ता. १ मे) करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यातील ३४ जिल्हा परिषदा सहभागी झाल्या होत्या. त्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे उपस्थित होते.

Asha Buchke-Ajit Pawar
ऐकून तर घे ना शहाण्या...राजन पाटलांसाठी मी साहेबांशी बोलेन..!

याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बापू करंदीकर, अनिल कवडे, कांतीलाल उमाप, दौलत देसाई, सूरज मांढरे, उदय जाधव आणि आयुष प्रसाद अशी नावे घेतली. तेवढ्यात कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद सदस्या बुचके यांनी ‘कांतीलाल उमापही आले आहेत,’ असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनी ‘हो आहेत, मी त्यांचं नावदेखील घेतले आहे. आपल्या लक्षातच राहत नाही, मी काय बोलते ते. त्यामुळे तुमच्याकडून राहून गेले. पहिलं तुमचं लक्ष शिवसेनेकडे असायचं, आता भाजपकडे असतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडे तुमचं लक्षच नसतं, त्यामुळे माझी पंचाईत होते, असा टोला भाजपच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना लगावला.

Asha Buchke-Ajit Pawar
सोलापूर जिल्हा बॅंक चालवायला मी अन्‌ शरद पवारांनी यायचं का? : अजितदादांनी सुनावले

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आले होते. त्यात विजय कोलते, संपतराव देवकाते, योगिता कोकरे, जालिंदर कामठे, देवराम लांडे, सतीश खोमणे, वैशाली आबणे, सविता दगडे, प्रदीप कंद, विश्वास देवकाते, निर्मला पानसरे, शैलजा ढोबळे यांचा समावेश होता. त्यांचे स्वागत करताना अजितदादा म्हणाले की, आज जालिंदर कामठे (राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला आहे) हेही आले आहेत, कामठे तर बऱ्याच दिवसांनी मला भेटले आहेत. देवराम लांडे हे दुसरीकडे जाऊन परत आले आहेत (राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले, त्यानंतर शिवसेनेतून ते राष्ट्रवादीत आले आहेत). प्रदीप कंदही आहेत, ‘तो तर काय आता विचारूच नका,’ असे म्हणत भाजपत गेलेल्या आपल्या माजी सहकाऱ्यांबाबत त्यांनी भाष्य केले.

Asha Buchke-Ajit Pawar
‘दोन-तीन दिवसांत काय चमत्कार घडू शकतो?, हे फक्त राजन पाटीलच दाखवू शकतात...’

तेवढ्यात माजी अध्यक्षा शैलजा ढोबळे ह्या उशिरा आल्या, त्यावर अजित पवार यांनी, ‘उशिरा आल्यामुळे सर्वांचं लक्ष जातं, त्यामुळे काहीजण उशिरा येतात,’ असा चिमटाही घेतला. शिवाय आपल्याला पत्रकार संघातील कार्यक्रमामुळे यायला उशिरा झाल्याबद्दल अजित पवार यांनीही दिलगिरी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.