बारामतीतल्या आशा वर्करनी आपलं गाऱ्हाण मांडलं थेट निर्मला सीतारामन यांच्याकडे

Nirmala Sitaraman| Baramati Politics| सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा बारामती दौऱ्याला सुरुवात झाली.
Nirmala Sitaraman|
Nirmala Sitaraman|

बारामती : बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने (bjp) कंबर कसली आहे. निर्मला सीतारमण भाजपच्या (BJP) मिशन बारामती (Baramati) अभियानाला सुरुवात झाली. त्यासाठी सीतारमण बारामती दौऱ्यावर आल्या. दौऱ्यावर असताना निर्मला सीतारमण यांनी आशा वर्कर्सची भेट घेतली.

आशा वर्कर्संनी मानधनाच्या ऐवजी वेतन मिळावे, आशा सेविकांना अनेक कामं मिळावीत, अशी थेट मागणीच सीतारामण यांच्याकडे केली. इतकेच नव्हे तर, मानधन तत्वावर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रारही त्यांना मांडल्या.

Nirmala Sitaraman|
Baramati Politics| बारामतीसाठी सितारमण यांच्याकडून फक्त चार तासांचा वेळ

आज सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा बारामती दौऱ्याला सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांनी जेजुरीतील खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींबरोबर संघटनात्मक कार्यक्रम घेतला. त्यानंतर त्यांनी बारामतीतील मोरगाव येथील त्यांनी श्री मयुरेश्वर अष्टविनायक मंदिरात बाप्पांचे दर्शन घेतले.

बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी घराणेशाही व भ्रष्टाचार या विरोधात काम करण्यासाठी बारामतीत भरपूर संधी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापुढील काळात मतदारांपर्यंत पोहोचत केंद्राच्या सर्व योजना मतदारांना समजून सांगाव्यात, असे आवाहन केले. एकाच मतदारसंघात होणारी प्रगती दूर करून सर्व मतदारसंघात समान विकास साध्य केला पाहिजे, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com