Pimpri Chichwad News : मंत्र्यांच्या वेळेअभावी पिंपरी-चिंचवडककरांच्या तोंडचे पाणी पळाले!

Ajit Gavhane : जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी मंत्र्यांना वेळ नसल्याने पिंपरी-चिंचवडकर वेठीस
Pimpri Chichwad News : Ajit Gavhane
Pimpri Chichwad News : Ajit Gavhane Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chichwad News) जलशुध्दीकरण केंद्रांचे काम पूर्ण होऊन फक्त मंत्र्यांच्या वेळेअभावी त्याचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरु असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आणखी वेठीस धरले जात असल्याने, या केंद्राचे उदघाटन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला आज दिला.

Pimpri Chichwad News : Ajit Gavhane
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'राष्ट्रीय दर्जाला' धोका नाही; पक्षाने आयोगासमोर मांडली बाजू

चिखलीतील हे केंद्र सुरु न झाल्याने शहरवासियांना पुरेसे हक्काचे पाणी मिळत नाही. मोठी पाणीटंचाई असताना प्रसिद्धीचा हव्यास आणि श्रेयासाठी भाजपकडून शहरातील २७ लाख जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे, असा हल्लाबोल आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी केला. या पाणीटंचाईला जबाबदार असलेल्या प्रशासन आणि भाजपच्या नेत्यांनी ३१ मार्चपर्यंत या केंद्राचे उद्‌घाटन न केल्यास राष्ट्रवादी ते करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

25 नोव्हेंबर 2019 पासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरण भरूनही शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे त्यात भर पडली आहे. विविध भागातून दररोज अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या हजारो तक्रारी आहेत. सोसायट्यांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ भाजपच्या मनमानी कारभारामुळे आली आहे.

परिणामी शहरवासियांच्या मनात पालिका प्रशासन आणि भाजपबद्दल प्रचंड चीड निर्माण होऊ लागली आहे. पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत शहरवासीय जागा दाखवतील, असे गव्हाणे म्हणाले.

Pimpri Chichwad News : Ajit Gavhane
Eknath Shinde : राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच मनसेचे एकमेव आमदार अन् मुख्यमंत्र्यांनी साधला मुहूर्त : म्हणाले..

आंद्रा धरणाचे 100 एमएलडी पाणी शहरात पहिल्या टप्प्यात येणार आहे. यासाठी चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन चाचणीही झाली आहे, असे असताना पालिका प्रशासन आणि शहरातील भाजपच्या नेत्यांना या जलशुध्दीकरण केंद्राच्या उद्‌घाटनासाठी मंत्र्यांना आणायचे आहे.

मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने शहरवासियांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप चालविले आहे. या केंद्राचे काम यापूर्वीच पूर्ण झाल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सांगत असताना फक्त प्रसिध्दीच्या हव्यासापोटी आणि श्रेयासाठी भाजपच्या नेतेमंडळींनी जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार चालविला आहे, असे गव्हाणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com