`शाहरूखने मोदींची कधीच स्तुती केली नाही.. म्हणून आर्यनवर ही वेळ आलीय...`

आर्यन (Aryan) याला आता 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावे लागणार..
`शाहरूखने मोदींची कधीच स्तुती केली नाही.. म्हणून आर्यनवर ही वेळ आलीय...`
Shahrukh-AryanInternet

पुणे : आर्यनखानचा (Aryan Khan) जामीन अर्जावर निर्णय घेण्यास न्यायालयाने 20 आॅक्टोबरची तारीख दिल्याने त्याला आणखी काही दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. यावरून जामीन देण्यापूर्वीच्या कायद्याच्या प्रक्रियेदरम्यान होणारा छळवाद या प्रकरणात दिसतो, अशी प्रतिक्रिया वकिल असीम सरोदे (Asim Sarode) यांनी व्यक्त केली आहे.

आर्यनखानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सरकारी वकिल आणि त्याचे वकिल या दोघांत जोरदार युक्तिवाद झाला. आर्य़नच्या व्हाटस अप चॅटमधून महत्वाची माहिती मिळवायची असल्याचा मुद्दा अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिलसिंग यांनी मांडला. तर हे व्हाटस अप चॅट म्हणजे तरुणांच्या गप्पा आहेत, त्यात फार अर्थ शोधू नये, असा मुद्दा आर्यनचे वकिल अमित देसाई यांनी न्यायालयाला सादर केला. त्यावर न्यायालयाने यावर वीस ऑक्टोबरला अंतिम निकाल देणार असल्याचे जाहीर केले.

Shahrukh-Aryan
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा असाही फंडा.. घातला अनेकांना गंडा!

या साऱ्या प्रकाराबाबत सरोदे यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्यन खानच्या जवळ (त्याच्या खिशात ) म्हणजेच अंगावर कोणतेही ड्रग्ज सापडले नाही असे स्वतः NCB च्या अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केले आहे. ड्रगडिलिंग रॅकेटमध्ये त्याचा सहभाग आहे का? त्याला कुणाचे मेसेज आलेत, त्याने कुणाला मेसेज केले आहेत, त्याने कुणाला फोन केले, त्याला कुणाचे कॉल आलेत, त्याचे व्हाट्स अपचे मेसेज काय आहेत? हे सगळे NCB ला म्हणजे केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी यंत्रणेला शोधायचे आहे असे म्हणणे NCB तर्फे वकील अनिल सिंग यांनी मांडले.

आर्यन खानच्या ऐवजी दुसरा कोणी असता व वरील परिस्थिती असती तर त्याला काही विशिष्ट अटींवर जामीन मिळाला असता हे नक्की. या केसमध्ये आर्यन खानमुळे इतरांना सुद्धा जामीन मिळतांना अडचणी येत आहेत. जामीन देण्यापूर्वीचा कायद्याच्या प्रक्रियेदरम्यान होणारा छळवाद या प्रकरणात दिसतो, असे स्पष्ट मत सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडले आहे.

Shahrukh-Aryan
आर्यन खानच्या व्हॉट्स अॅपमध्ये आंतरराष्ट्रीय लिंक; न्यायालयानं दिला झटका

आर्यन खानकडे काही सापडले नाही व त्याच्या फोन संदर्भातील तपास करायचा आहे तर त्याचा मोबाईल जप्त करायचा. त्यासाठी त्याला इतके दिवस जेलमध्ये ठेवणे हा कोणता न्याय आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. ड्रग्ज घेणे, विकणे, तश्या पार्ट्या करणे या सगळ्या आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे, असे माझे मत आहे. शाहरुख खान कधीच जाहीरपणे नरेंद्र मोदींची तरफदारी करीत नाही. त्याने कधी त्यांची स्तुती केली नाही म्हणून केंद्रीय अंमली पदार्थ यंत्रणेचा चुकीचा वापर होतांना याप्रकरणी स्पष्ट दिसते. दुसरी एक गोष्ट दिसण्यासारखी आहे की, कुणीही नामवंत वकील लावले तरीही जामीन होण्यासाठी लागणारा विलंब त्यांची हतबलता दाखविणारा आहे, असेही सरोदे यांनी म्हटले आहे.

Shahrukh-Aryan
आर्यन खानबाबत अजितदादा म्हणाले, 'मुलं कोणाचीही असो, नियम सगळ्यासाठी सारखाच'

अश्या केसेसना सगळ्या प्रक्रिया व्हायला वेळ लागतोच. अशी सारवासारव करण्यात अर्थ नाही. गुन्ह्यांच्या चौकशीची व कायद्याची प्रक्रिया दूषित करणाऱ्यांचा स्पष्टपणे निषेध करता आला पाहिजे. अंमली पदार्थांची नशा करणाऱ्यांना सरसकट गुन्हेगार म्हणून वागणूक देणे कायदेमान्य सुद्धा नाही. अशा ड्रग्स घेणाऱ्या अनेकांना मानसोपचाराची गरज असते. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या नवयुवांना तुरुंगात न ठेवता त्यांना कायद्यातील तरतुदींनुसार मानसिक पुनर्वसन केंद्रात ठेवले जाऊ शकते. याचा काहीच विचार न्यायालय सुद्धा करणार नसेल तर आपली व्यवस्था मागासलेली राहील हे सुद्धा लक्षात घ्यावे. विषय केवळ आर्यन खानचा नाही तर आपल्या व्यवस्था कशा चालवल्या जातात व त्यामागील दृष्टीकोन काय याचा आहे, असे स्पष्ट मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in