Bribery : दोन हजार महागात पडले; महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

या प्रकरणाचा पुढील तपास तपास पोलिस उपअधीक्षक क्रांती पवार करीत आहेत.
Bribery
BriberyFile Photo

Bribery News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणाच्या कनिष्ठ अभियंत्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहकांच्या घरगुती वीज जोडणीसाठी ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. अजय दत्तात्रेय शेवकरी असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे विभागात ठेकेदाराने तक्रार केली होती. शेवकरी राजगुरुनगर उपविभागात कार्यरत आहे. तर तक्रारदार हे विद्युत ठेकेदार आहेत. त्यांच्याकडील ग्राहकांचे घरगुती वीज जोडणीच्या मंजुरीसाठी अभियंता शेवकरी याने सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराशी झालेल्या तडजोडीनंतर शेवकरी दोन हजार रुपयांपर्यंत आले. या प्रकरणी संबंधित ठेकेरेदाने पोलिसांकडेही तकार केली होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले.

Bribery
Uddhav Thackeray : फडणवीसांच्या नागपुरात का पेटली नाही उद्धव ठाकरेंची मशाल ?

अजय शेवकरी याला खेड येथील विशेष न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तपास पोलिस उपअधीक्षक क्रांती पवार करीत आहेत. तर पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com