खळबळजनक : पिस्तूलधारी दरोडेखोरांनी भरदुपारी बॅंक लुटली; दोन कोटींच्या सोन्यासह ३० लाखांची रोकड लंपास

या घटनेमुळे शिरूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Bank of Maharashtra
Bank of Maharashtrasarkarnama

पुणे : शिरूर तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पिंपरखेड येथील शाखेवर आज (ता. २१ ऑक्टोबर) भरदुपारी पाच ते सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकला. या दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून बॅंकेतून रोख ३१ लाख रुपये आणि सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे सोने चोरून नेल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिरूर पोलिसांनी घटनास्थळी पोचून तपास सुरू केला आहे. (Armed robbery at a bank in Shirur taluka ; Loot of Rs 30 lakh including Rs 2 crore gold)

पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे काम आज सुरळीतपणे सुरू असताना दुपारी एका मोटारीतून पाच ते सहा जणांची हत्यारबंद टोळी बँकेत शिरली. त्यातील एक दरोडेखोर हा बँकेच्या दरवाजात उभा राहिला, तर बाकीच्यांनी बॅंकेत जाऊन अधिकारी आणि ग्राहकांना शस्त्राचा धाक दाखवला. त्यांच्या हातात पिस्तूल होते. दरोडेखोरांनी त्या पिस्तुलाचा धाक दाखवत बँकेतून रोख रक्कम ३१ लाख रुपये आणि सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने लुटले. ते घेऊन ते दरोडेखोर नगरच्या दिशेने पळून गेले. ही सर्व घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याआधारे शिरूर पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. हे सर्व दरोडेखोर हे 25-30 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Bank of Maharashtra
राष्ट्रवादी प्रवेशाआधी नीलेश लंकेंनी अजितदादांसाठी धरला होता हट्ट!

महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडल्यानंतर पुणे आणि नगर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दले आणि नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. दरोडेखोर हे 25-30 वयोगटातील असून त्यांनी निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी, चष्मा आणि पायात बूट घातलेले होते. हे सर्वजण सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडीतून आले होते. त्या गाडीच्या पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले होते. लूटमार करून ते दरोडेखोर त्याच गाडीतून नगर दिशेला पळून गेले आहेत.

Bank of Maharashtra
समीर वानखेडे बोगस माणूस, वर्षभरात तुरुंगात जाणार

पिंपरखेड गावालगतचा परिसर असलेल्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे आणि इतर गावांतील पोलिस पाटील यांना याबाबतची माहिती आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करावी. तसेच, वरील वर्णनाची गाडी आणि संशयित दिसल्यास अथवा याबाबत काही माहिती मिळाल्यास मंचर पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा. शक्य झाल्यास ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने संबंधित गाडी आणि त्या दरोडेखोरांना पकडून ठेवावे, असे अवाहन करण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com