राज ठाकरेंचा निर्णय; रूपाली पाटील पुण्याच्या जबाबदारीतून मुक्त

अगामी महानगरपालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष घातले आहे.
राज ठाकरेंचा निर्णय; रूपाली पाटील पुण्याच्या जबाबदारीतून मुक्त
Raj Thackeraysarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुणे शहरातील महिला कार्यकारिणीत बदल केला आहे. महिला शहराध्यक्षा म्हणून माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती केली आहे. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडीचे पत्र दिले.

अगामी महानगरपालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुण्यात लक्ष घातले आहे. त्यांनी पुण्यातील शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यानंतर आता महिला आघाडीमध्येही बदल केला आहे. माजी महिला शहर अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या जागी वागस्कर यांनी नियुक्ती केली आहे. तसेच उपशहर अध्यक्ष पदी पदमीनी साठे, जयश्री पाथरक, अस्मिता शिंदे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Raj Thackeray
इथून परत जाणं एवढं सोपं नाही! राणेंचा जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर इशारा

यावेळी पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी शहराध्यक्षा रुपाली पाटील, पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष व माजी नगरसेवक उपस्थित होते. पुणे महानगर पालिकेची निवडणूक राज ठाकरे यांनी मनावर घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे यांनी गेल्या तीन महिन्यत तब्बल आठवेळा पुणे दैरा केला आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीच्या कामाचा आढावा घेतला आहे.

कसली ही नीती? सोलापुरात इंदापूरची भीती

मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाला सर्वाधिक प्रतिसाद नाशिक आणि पुण्यातून मिळाला. पुण्यात मनसेचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. पहिल्या झटक्यात मनसे पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे संघटना बांधणीवर लक्ष देऊन येत्या निवडणुकीत पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे ठाकरे यांचे प्रयत्न आहेत.

Related Stories

No stories found.