BARTI News : 'बार्टी'च्या महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती,गजभियेंची तडकाफडकी बदली

State Government Order : बार्टी अनुसूचित जाती‎ जमातीतील विद्यार्थांना स्पर्धा‎ परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता‎ प्रशिक्षण देते.
Barti News
Barti NewsSarkarnama

Pune News : राज्य सरकारकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)च्या महासंचालक धम्मज्योती‎ गजभिये यांची सोमवारी‎ तडकाफडकी बदली करण्यात‎ आली आहे. बार्टीच्या महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून याबाबत प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महासंचालकपदी सुनील वारे (Sunil Ware) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच‎ वारे यांना तत्काळ पदभार‎ स्वीकारण्याचे आदेश देण्यात‎ आले आहे. यासोबतच बार्टी(BARTI) पुणेच्या महासंचालकपदावरुन धम्मज्योती गजभिये यांची बदली करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. धम्मज्योती गजभिये हे 20 सप्टेंबर 2021 रोजी बार्टीच्या महासंचालकपदावर रुजू झाले होते.

Barti News
Nana Patole; महाराष्ट्राला लुटायचे अन् सुरतला वाटायचे हेच भाजपचे काम

बार्टी अनुसूचित जाती‎ जमातीतील विद्यार्थांना स्पर्धा‎ परीक्षेच्या पूर्व तयारीकरीता‎ प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणाचा‎ कालावधी सहा महिने असतो.

‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांची बदली‎

बार्टीचे महासंचालक धम्मज्योती‎ गजभिये यांची सोमवारी‎ तडकाफडकी बदली करण्यात‎ आली व कार्यमुक्तीचे आदेश‎ सोमवारी देण्यात आले. त्यांच्या‎ जागी सुनील वारे यांची नियुक्ती‎ करण्यात आली आहे. तसेच सुनील‎ वारे यांना तत्काळ पदभार‎ स्वीकारण्याचे आदेशित करण्यात‎ आले.

Barti News
Maharashtra Politics : 'बाळासाहेब' ही काय त्यांची खासगी मालमत्ता आहे का? फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

उच्च न्यायालयात याचिका दाखल...

राज्य सरकारच्या बार्टी संस्थेद्वारे प्रशिक्षण संस्थांना‎ दिलेल्या कंत्राटविषयी अकोल्यातून‎ तक्रार करण्यात आली होती. स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी‎ अकोला, बुलडाणा व अमरावती‎ येथील तीन संस्थांना‎ कंत्राट दिले होते. या तीनही संस्था‎ अकोल्यातील प्रा. संतोष कुटे‎ यांच्या आहेत. तसेच बार्टीकडे‎ सादर करण्यात आलेल्या‎ कागदपत्रांमध्ये तीनही ठिकाणचे‎ शिक्षक व विद्यार्थी एकच‎ असल्यानं ही शासनाची फसवणूक‎ आहे असा आरोप‎ प्रा.‎ चंदू सिरसाट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in