पालिका सेवेतील निकम यांची शहर अभियंतापदी नियुक्ती

Pimpri-chinchwad latet news| भाजप आमदार महेश लांडगे यांनी पालिका सेवेतील अधिकाऱ्याची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
Pimpri-chinchwad latet news update
Pimpri-chinchwad latet news updateSarkarnama

Pimpri-chinchwad latet news

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) शहर अभियंता राजन पाटील या महिनाअखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्य़ांच्या जागी सहशहर अभियंता (स्थापत्य) मकरंद निकम यांची पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काल (ता.२६) पदोन्नतीने नियुक्ती केली. ती करताना राज्य सेवेतून आलेल्या अधिकाऱ्याऐवजी पालिका सेवेतील निकमांची ती केल्याने पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाची भावना आहे.

पदाचा आणि शहराचा नावलौकिक वाढेल,असे काम करू,अशी प्रतिक्रिया निकम यांनी आपल्या नियुक्तीवर शुक्रवारी (ता.२७) `सरकारनामा`ला दिली. त्यांच्या निवृत्तीला पाच वर्षे बाकी असल्याने तेवढा काळ ते या पदावर राहण्याची शक्यता आहे. किंवा तत्पूर्वी त्यांना पुन्हा पदोन्नतीही मिळू शकते. विद्यमान शहर अभियंत्यांची कारकिर्द काहीशी निष्क्रीय अशीच गेली.त्यांना आपल्या कामाचा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे आता निकम यांच्या कामगिरीकडे शहराचे लक्ष लागले आहे.

शहर कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी पालिका सेवेतील अधिकाऱ्याची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्याची मागणी केली होती.ती मान्य झाल्याने त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांचा हा स्वागतार्ह निर्णय असल्याची

प्रतिक्रिया निकमांच्या नियुक्तीवर दिली. राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर, सह शहर अभिंयता श्रीकांत सवणे आणि निकम अशा तिघांमध्ये या पदासाठी रस्सीखेच होती. मात्र, भालकर यांच्या प्रतिनिुयुक्तीचा कालावधी संपल्याने त्यांची या पदी नेमणूक न झाल्याचे समजले.तर, शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवा ज्येष्ठता,गोपनीय अहवाल आदींचा विचार करून निकम यांना संधी देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com