Chinchwad By-Election : आघाडी वा युतीला मतदान न करता `नोटा` चे बटन दाबण्याचे मुस्लिमांना आवाहन; 'हे' आहे कारण

मुस्लिम मतदारांनी नोटा दाबण्याचे आवाहन करताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतदारांची भेट घेतली.
Chinchwad by-election
Chinchwad by-electionSarkarnama

Chinhwad By-Election : परवा मतदान होत असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात १५.८० टक्के म्हणजे ८९ हजार ४९४ मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिम धर्मियांच्या मुलभूत समस्यांकडे आतापर्यंत आघाडी व युतीनेही दुर्लक्ष केलेले असल्याने त्यांच्या उमेदवारांना त न देता `नोटा`चे बटन दाबण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेने आज केले आहे.

Chinchwad by-election
ACB Pune : मोदीबागेत बडा मासा जाळ्यात ; 'जलसंपदा'अधिकारी रिटायर होण्याआधीच..

समाजाच्या प्रश्नाबाबत स्पष्ट व सकारात्मक भूमिका न घेणाऱ्या सत्ताधारी व विरोधकांना `नोटा` चा वापर करून त्यांची जागा दाखवून द्यावी,असे आवाहन परिषदेने आज केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची पळापळ झाली. त्यांचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे आणि कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी हे परिषदेचे अध्यक्ष अकील मुजावर यांना जाऊन भेटले. पण,ते बधले नाहीत. त्यामुळे स्वत: अजित पवार हे आपले राष्ट्रीय सरचिटणीस सुभानअली शेख यांना घेऊन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे सचिव गुलामभाई शेख यांना आज भेटले. त्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. आमच्या स्थानिक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी तुमची प्रलंबित कामे माझ्याकडून करवून घेतली नाहीत,असे ते म्हणाले. पण, त्यासंदर्भात आपल्यालाही भेटलो होतो, याकडे गुलामभाई यांनी लक्ष वेधले.

आमची नाराजी तथा संताप व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे मुजावर यांनी सरकारनामाला सांगितले. मतदानावर बहिष्कार टाकलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पिंपरी चिंचवडचा विकास झाला हे मान्य असून त्याचे कौतूकही आहे. पण, या विकासात मुस्लिम समाजाला स्थान कोठे आहे, अशी विचारणा त्यांनी केली.

शहर नियोजन आरखड्यात कब्रस्तानासाठी जागा राखीव न ठेवल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. विकासाच्या नावाखाली पिंपळे सौदागर येथील जुन्या दफनभूमीतील कबरी कोणालाही विश्वासात न घेता गुपचूपपणे रात्रीच्या वेळी तोडल्या गेल्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबरोबरच आरक्षण, कत्तलखाना,उर्दू शाळा, होणारे हल्ले, आर्थिक बहिष्कार आदी समाजाचे प्रश्न असून ते न सुटता उलट त्यांची तीव्रता वाढत असल्यामुळे नोटा'चे बटन दाबण्याचे आवाहन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in