हर्षवर्धन पाटलांमुळे ताकद वाढलेल्या आप्पासाहेब जगदाळेंनी भरला अर्ज : राष्ट्रवादीच्या डावपेचाकडे लक्ष!

पुणे जिल्हा बॅंकेसाठी इंदापुरातून अ वर्ग मतदारसंघासाठी आप्पासाहेब जगदाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Appasaheb Jagdale
Appasaheb JagdaleSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ६ डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. जगदाळे हे इंदापूर तालुका प्रतिनिधी ‘अ’ वर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जगदाळे यांनी आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद सोबले यांच्याकडे सुपूर्त केला. (Appasaheb Jagdale's nomination from Indapur for Pune District Bank)

दरम्यान, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत हर्षवर्धन पाटील यांच्याशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत तालुक्यात उत्सुकता होती.

Appasaheb Jagdale
शिराळ्याला ३० वर्षांनंतर जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद; उपाध्यक्षपद वसंतदादा घराण्याकडे

इंदापुरातून आप्पासाहेब जगदाळे हे गेली १९ वर्षांपासून बँकेवर संचालक म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद भूषवले आहे. बाजार समितीची सत्ता त्यांनी एकहाती ठेवली होती. इंदापूर ‘अ’ वर्ग प्रतिनिधी सोसायटी मतदार संघातून १८५ मतदार प्रतिनिधी आहेत. हर्षवर्धन पाटील यांची ताकद पाठीशी असल्यामुळे त्यांचा विजय आणखी सोपा झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.

Appasaheb Jagdale
अजित पवार म्हणतात...तुम्ही खुशाल पवारसाहेबांकडे माझ्याबद्दल तक्रार करा!

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत आमदारकीचे तिकीट न मिळाल्याने जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतली होती. त्या निवडणुकीत त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला होता. जगदाळे यांनी कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. विधानसभा आणि कारखाना निवडणुकीत झालेली मदत यामुळे हर्षवर्धन पाटील हे जगदाळेच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार, या शंका नाही. त्यामुळे जगदाळे यांचे पारडे निवडणुकीत जड आहे. त्यांच्या माध्यमातून भाजप विचारांचा प्रतिनिधी बॅंकेत जाणार आहे. अर्ज भरताना ॲड कृष्णाजी यादव, पृथ्वीराज जाचक, मयूरसिंह पाटील, मोहन दुधाळ, देवराज जाधव, मारुतराव वनवे, विलास वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर, किरण बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Appasaheb Jagdale
निवडणूक आली की आमच्या विरोधकांच्या अंगात येते : अजित पवार बरसले

जिल्ह्यातील आगामी निवडणुका लक्षात घेता जगदाळे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काय पवित्रा घेते याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्री छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक आणि सणसरचे सरपंच ॲड. रणजित निंबाळकर आणि छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनी अ वर्ग मतदारसंघातून उमेदवार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या सूचनेप्रमाणे उमेदवारी अर्ज भरल्याचे निंबाळकर व सपकळ यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com