इंदापुरात मामा-भाचे एकत्र! जगदाळे यांच्या पाठिंब्यामुळे हर्षवर्धन यांना दिलासा

इंदापुरात मामा-भाचे एकत्र! जगदाळे यांच्या पाठिंब्यामुळे हर्षवर्धन यांना दिलासा

इंदापूर : राजकारणात कुणीकुणाचे शत्रू नसते हे अप्पासाहेब जगदाळे यांच्या माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे सिद्ध झाले आहे.

श्री. जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा आहेत. त्यामुळे या खेळीमुळे  मामा- भाचे यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे पारडे जड झाले आहे. यासाठी किंगमेकर म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

जगदाळे यांची राजकीय सुरुवातबावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत दिग्गज अविनाश घोलप यांचा पराभव केला. बँक संचालका बरोबरच ते निरा भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष झाले.सलग तीन वेळा बँकेवर निवडून जाऊन त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. या कालावधीत त्यांनी दमदार व दिलदार नेता म्हणून आपली प्रतिमा केली.

सन 2004 विधानसभा निवडणुकीत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मदत केली. मात्र सन 2007 त्यांचे तात्विक मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी फारकत घेतली. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील  यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे नाव पुढे आले. मात्र त्यावेळी अशोक घोगरे यांच्या मध्यस्थीमुळे दत्तात्रय भरणे याना तिकीट मिळाले. यावेळी भरणे यांचा थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये भरणे यांच्या विजयात त्यांनी मोठी भूमिका बजावली.

त्यावेळी त्यांना भरणे  यांनी 2019 मध्ये आमदारकी लढवण्याचा शब्द दिला होता मात्र हा शब्द न पाळला गेल्याने त्यानी राष्ट्रवादी काँगेस अंतर्गत तिकीट मिळेल या भरवशावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. निरा नदीत पाणी व बंधाऱ्यांना स्वयंचलित दारे बसवा तसेच इतर 14 त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. सदर मागण्या मान्य झाल्यामुळे अप्पासाहेब यांनी महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला.

छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अशोक घोगरे, अरविंद वाघ तसेच पंचायत समिती सदस्य प्रदिप जगदाळे यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. या वेळी पद्माताई भोसले उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com